Hapus Rate: फळांचा राजा ऑक्टोबर महिन्यातच बाजारात, मुंबईत हापूसचा भाव काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Hapus Rate: फळांचा राजा हापूस आता दिवाळीतच बाजारात दाखल झाला आहे. मुंबई मार्केटमध्ये हापूस आणि काळाबार आंब्याचे दर जाणून घेऊ.
मुंबई : आंबाप्रेमींची ही दिवाळी आणखीनच गोड झाली आहे. कारण यंदा जगप्रसिद्ध फळांचा राजा, हापूस ऑक्टोबर महिन्यातच बाजारात दाखल झाला आहे. सामान्यत: हापूस आंबा मार्च ते मे दरम्यान येतो, परंतु यंदा हा आंबा दिवाळीच्या अगोदरच आंबाप्रेमींना मिळत आहे. मुंबई मार्केटमध्ये 1500 ते 3000 रुपयांपर्यंतचा भाव या आंब्याला मिळतोय.
यंदा मुंबई फळ बाजारात हापूस सोबतच काळाबार आंबा देखील दाखल झाला आहे. कोकणातील देवगड आणि मालवण येथील प्रगतिशील आंबा बागायतदारांनी यंदा हापूस आंबे वाशी (मुंबई) आणि सातारा बाजारात पाठविण्याचा मान मिळवला आहे. देवगड तालुक्यातील पडवणे गावातील बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी हापूस आंब्याची पहिली पेटी लक्ष्मीपूजनानंतर 20 ऑक्टोबरला वाशी मार्केटला पाठवली. ही पहिली पेटी बाजारात दाखल झाल्याने आंबा प्रेमींची उत्सुकता वाढली आहे.
advertisement
प्रत्येक मार्केटमध्ये आंब्यांचे दर वेगवेगळे ठरतात. मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड फ्रुट मार्केटमध्ये सुद्धा हापूस आंबा पोहोचला असून, व्यापारी समीर गफर यांनी क्रॉफर्ड फ्रुट मार्केट मधील हापूस आंब्यांचे दर सांगितले आहेत.
हापूस आंब्याचे दर
मोठा हापूस आंबा – 2,500 ते 3000 रुपये डझन
advertisement
मध्यम आकाराचा हापूस – 2000 ते 2500 रुपये डझन
लहान आकाराचा हापूस – 1500 रुपये डझन
यंदा काळाबार आंबा सुद्धा बाजारात दाखल झाला असून, त्याची किंमत 2500 रुपये डझन पासून सुरू होते. काळाबार आंबा प्रत्येक हंगामाला येत नाही; जवळपास दोन वर्षांनी किंवा वर्षाला एकदा मिळतो, त्यामुळे आंबाप्रेमींमध्ये त्याची विशेष मागणी आहे. हापूस आणि काळाबार या दोन्ही आंब्यांच्या आगमनामुळे मुंबई, वाशी आणि कोकणातील आंबा प्रेमींमध्ये खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 2:18 PM IST

