Weight Loss : वाढते वजन नियंत्रित ठेवते 'या' पिठाची भाकरी! आहारात सामील करा, होतील अनेक फायदे
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Best roti for weight loss : आजच्या धावपळीच्या जीवनात अनहेल्दी खाण्याच्या सवयींमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढू लागले आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असून, ते कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. तुम्ही देखील वाढत्या वजनामुळे चिंतित असाल आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार शोधत असाल, तर आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलेली माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
याबद्दल माहिती घेण्यासाठी जेव्हा टीमने आयुर्वेदिक डॉक्टर दीपांकर अत्रे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले. डॉ. अत्रे यांच्या मते, तुम्ही भाकरीचे किंवा रोटीचे शौकीन असाल आणि गहू किंवा तांदळाला पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासमोर ज्वारी आणि नाचणी हे दोन उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहेत.
advertisement
advertisement
ज्वारी : ज्वारीची भाकरी तुमच्या आहारात प्रथिन्यांची मात्रा पूर्ण करते. विशेषतः, जिममध्ये जाणाऱ्या लोकांनी ज्वारीचा आहारात आवर्जून समावेश करावा. प्रथिनांनी समृद्ध असल्याने ती तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत स्नायूंचे जे नुकसान होते, त्यापासून ज्वारीची प्रथिने बचाव करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


