Success Story: MP चा शेतकरी पुण्यातून मागवलं बीज, महाराष्ट्रातच पिवळं अन् केशरी सोनं विकून कमावले 400000 रुपये
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Success Story: शिक्षण फारसे नाही, पण जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर शेतीही मालामाल करू शकते, हे मध्य प्रदेशातील एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. सातवी पास असलेला हा युवा शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती करून वर्षाला सुमारे ४ लाख रुपये कमवत आहे.
शिक्षणात यश आलं नाही सातवी पास शेतकऱ्याने मात्र युट्यूबची मदत घेतली आणि पारंपरिक शेतीपासून काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. त्याने थेट पुण्यातून रोपं मागवली अन् शेतात सोनं उगवलं, त्या सोन्यातून त्याने लाखो रुपयांचा नफा कमवला आहे. अवघ्या 7 वी पास शेतकऱ्याने ही कमाल केली आहे. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्याने हे कसं शक्य केलं त्याच्या संघर्षाची कहाणी आज जाणून घेणार आहोत.
advertisement
शिक्षण फारसे नाही, पण जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर शेतीही मालामाल करू शकते, हे मध्य प्रदेशातील एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. सातवी पास असलेला हा युवा शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती करून वर्षाला सुमारे ४ लाख रुपये कमवत आहे. फुलांसोबतच इतर भाज्यांची शेती करून त्याची एकूण वार्षिक कमाई १० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याची ही फुले मध्य प्रदेशासोबत महाराष्ट्रातही विकली जातात.
advertisement
advertisement
advertisement
त्याने महाराष्ट्रातील पुणे येथून 'ड्रीम यलो' नावाच्या वाणाची १० हजार रोपे मागवली. याशिवाय रतलाममधूनही खास वाणाची रोपे आणली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आधुनिक मल्चिंग पद्धत वापरून शेती सुरू केली आणि सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. २०२० पासून ते सातत्याने फुलांची शेती करत आहेत.
advertisement
सुनील वर्षभर एक एकर जमिनीवर फुलांचे उत्पादन घेतात आणि उर्वरित जमिनीत टरबूज, काकडी यांसारख्या भाज्यांचे पीक घेतात. मात्र, नवरात्री, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर ते फुलांच्या शेतीत वाढ करतात. उत्सवांच्या काळात चांगला नफा मिळावा यासाठी ते नवरात्रीपूर्वी सुमारे तीन एकरवर झेंडूची लागवड करतात. सध्या त्यांची फुले खरगोन, बडवानी, इंदूरसह महाराष्ट्रातही नियमितपणे पुरवली जातात. फक्त खरगोन जिल्हा मुख्यालयात ते दररोज ४० ते ५० किलो फुले पाठवतात.


