मकर रास
राहू ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन मकर राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन येईल. नोकरी आणि व्यवसायात मोठ्या संधी निर्माण होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता अधिक आहे. व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील, तसेच जुने अडलेले व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग असून, या प्रवासातूनही लाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
मिथुन रास
मिथुन राशीसाठी राहू ग्रहाचा हा गोचर अत्यंत लाभदायक ठरेल. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल आणि गुंतवणुकीतून नफा मिळेल. करिअरमध्ये नवीन मार्ग आणि संधी उघडतील. तुमच्या संवादकौशल्यामुळे लोकांवर प्रभाव पडेल, ज्याचा फायदा व्यवसायात होईल. या काळात मित्र आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुमचं नशीब तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या योजनांना यश मिळेल.
वृषभ रास
वृषभ राशीसाठी राहू ग्रह कर्मभावात संक्रमण करणार असल्याने हा काळ प्रगतीचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. उच्च पदावर बढती मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नाची नवी साधनं उपलब्ध होतील आणि परदेशातूनही चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात काहीजणांना विदेश प्रवासाचे योग जुळतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य तुमच्या यशात महत्त्वाची भूमिका निभावेल.
राहू गोचराचे एकूण परिणाम
राहू ग्रहाचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश हा आत्मपरीक्षण, नवीन विचार आणि प्रगतीचे संकेत देतो. या काळात काही राशींना अनपेक्षित यश मिळेल, तर काहींना सावध राहण्याची गरज आहे. या गोचरामुळे लोकांमध्ये महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास वाढेल, पण निर्णय घेताना संयम आवश्यक असेल.
