आता 2026 हे वर्ष शनिच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या काळात शनी ग्रह मीन राशीत भ्रमण करणार असून त्याची चाल, वक्री-अस्त स्थिती आणि साडेसातीचे परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवणार आहेत.
2026 मध्ये शनीची हालचाल कशी राहील?
29 मार्च 2025 रोजी शनीने कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश केला होता. 2026 वर्षभर शनी मीन राशीतच राहणार आहे. 7 मार्च ते 13 एप्रिल 2026 दरम्यान शनी अस्त स्थितीत असेल, म्हणजेच या काळात त्याचा प्रभाव काही प्रमाणात कमी जाणवेल. 13 एप्रिल 2026 नंतर शनी उदय होईल, आणि त्यानंतर त्याची कृपा व परिणाम पुन्हा तीव्र होतील. 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 या कालावधीत शनी वक्री म्हणजेच उलट दिशेने गती करेल. या काळात जुनी प्रकरणे, अपूर्ण कामे किंवा थांबलेली यशाची संधी पुन्हा समोर येऊ शकते. 11 डिसेंबर 2026 नंतर शनी पुन्हा मार्गी म्हणजेच सरळ गतीने चालू लागेल.
advertisement
2026 मध्ये साडेसातीचा प्रभाव
शनिच्या साडेसातीचा परिणाम साधारणपणे साडे सात वर्षे टिकतो आणि तीन टप्प्यांत अनुभवता येतो .आरंभ, मध्य आणि शेवट.
मेष राशी : साडेसातीचा पहिला टप्पा सुरू राहील. या काळात आर्थिक नियोजन व कामात सातत्य ठेवणे आवश्यक आहे.
मीन राशी : साडेसातीचा दुसरा टप्पा असेल. आरोग्य आणि मानसिक ताण याकडे लक्ष द्यावे, परंतु कठोर परिश्रमाचे फळ नक्की मिळेल.
कुंभ राशी : साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल. दीर्घकाळ चाललेले संघर्ष संपुष्टात येऊन स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे.
शनीच्या ढैय्याचा प्रभाव
याशिवाय, 2026 मध्ये धनु आणि सिंह राशींवर शनीची ढैय्या असेल. या काळात जबाबदारी वाढेल, निर्णय घेताना संयम ठेवावा लागेल. मेहनतीतूनच प्रगतीचा मार्ग खुला होईल.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
