TRENDING:

Toyota ची धाकड MPV, 23 किमी मायलेज अन् सेफ्टीमध्ये टँकसारखी दणकट, किंमत किती?

Last Updated:

या गाडीला ना चार्जिंग पॉइंटला लावावे लागते, ना वेगळी बॅटरी भरावी लागते. तरीही ही गाडी इलेक्ट्रिक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : मशिया ॲडवांटेज महाराष्ट्र एक्स्पो 2026 या प्रदर्शनात इनोव्हा हायक्रॉस ही चारचाकी गाडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कारण की, या गाडीला ना चार्जिंग पॉइंटला लावावे लागते, ना वेगळी बॅटरी भरावी लागते. तरीही ही गाडी इलेक्ट्रिक आहे. सेल्फ चार्जिंग हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानामुळे ही गाडी पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही शक्तींवर चालते. विशेष म्हणजे ही कार चालवताना आपोआप चार्ज होत राहते, त्यामुळे चार्जिंगची चिंता चालकाला करावी लागत नाही. तसेच या गाडीबद्दल संपूर्ण माहिती वाहन विक्रेता प्रतिनिधी आकाश जाधव यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement

नियमित गाड्यांची तुलना केल्यास टोयोटा या कंपनीची असलेली इनोव्हा हायक्रॉस या गाडीला तीन बाबी अधिकच्या पाहायला मिळतात. त्यामध्ये पॉवर युनिट, मोटार जनरेटर आणि 200 व्होल्टेजची हायब्रीड बॅटरी आहे. ही बॅटरी इंजिनला जोडली गेली असल्यामुळे या बॅटरीला चार्जिंग करायची आवश्यकता भासत नाही. ज्याप्रमाणे गाडीचा वेग कमी असेल तसेच जिथे पॉवर पिकअप कमी असणार तिथे बॅटरी चार्जिंग होण्याचे प्रमाण वाढणार आहे. जास्त पॉवर पिकअपची आवश्यकता असल्यास ज्या वेळेला गाडीचा वेग वाढेल त्या वेळेला आपोआप गाडी इंजिनवर होईल, असे टोयोटा वाहन विक्री प्रतिनिधी आकाश जाधव यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.

advertisement

हायब्रीड काय आणि ही टेक्नॉलॉजी कशी काम करते?

हायब्रीडमध्ये दोन वेगवेगळ्या शक्तींचा एकत्रित वापर होतो. गाड्यांच्या बाबतीत, पेट्रोल-डिझेल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही एकत्र काम करतात, त्यामुळे इंधन बचत होते आणि प्रदूषण कमी होते. भारतामध्ये 1991 मध्ये टोयोटाने हायब्रीड तंत्रज्ञान विकसित केले होते. सध्याची चालणारी इनोव्हा हायक्रॉस गाडीमध्ये पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटार आणि बॅटरी दिली आहे.

advertisement

शहरातील वाहतूक, कमी वेग किंवा ट्रॅफिकमध्ये ही कार अनेक वेळा पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडवर चालते. ब्रेक मारताना किंवा वेग कमी करताना निर्माण होणारी ऊर्जा बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरली जाते. यालाच सेल्फ चार्जिंग प्रणाली म्हणतात. त्यामुळे या गाडीला वेगळे चार्जिंग करण्याची गरज लागत नाही आणि इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होते.

ग्राहकांना हायब्रीड गाडीचा फायदा कसा?

advertisement

हायब्रीड तंत्रज्ञानामुळे इनोव्हा हायक्रॉस उत्तम मायलेज देते, ज्याचा थेट फायदा ग्राहकांच्या खिशाला होतो. पेट्रोलचा वापर कमी होत असल्याने खर्चात बचत तर होतेच, शिवाय प्रदूषणही कमी होते. पारंपरिक पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत या गाडीमधून कार्बन उत्सर्जन कमी होते आणि आवाजही तुलनेने कमी असतो. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहन म्हणून हायक्रॉसकडे पाहिले जात आहे.

advertisement

गाडीची किंमत किती? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, सोयाबीन आणि कांद्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

Toyota Innova Hycross Hybrid असल्यामुळे तब्बल 23.24 kmpl (ARAI) इतका मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे. इनोवा हायक्रॉस हायब्रीड या गाडीची किंमत 19 लाखांपासून ते 32 लाख रुपयांपर्यंत आहे. 

मराठी बातम्या/ऑटो/
Toyota ची धाकड MPV, 23 किमी मायलेज अन् सेफ्टीमध्ये टँकसारखी दणकट, किंमत किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल