सर्वसामान्यांसाठी ही आहे सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक 7-सीटर कार! जाणून घ्या मायलेज-किंमत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Cheapest Automatic Car: तुम्हाला कमी बजेटमध्ये मोठी फॅमिली कार हवी असेल तर तुमच्यासाठी एक भारी ऑप्शन आहे. Renault Triber तुमच्यासाठी बेस्ट कार ठरु शकते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
advertisement
Renault Triber ची किंमत किती? : Renault Triber ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत जवळपास 5.76 लाख रुपये आहे. ज्यामुळे ही बजेट सेगमेंटची सर्वात स्वस्त 7-सीटर कार बनते. या कारचं ऑटोमॅटिक AMT व्हेरिएंट जवळपास 8.39 लाखांपासून सुरु होतो. या किंमतीत तुम्हाला 7 सीट आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळल्याने ही Maruti Ertiga आणि Kia Carens सारख्या गाड्यांपेक्षा खुप स्वस्त पर्याय बनते. कमी बजेटमध्ये मोठी फॅमिली कार हवी असणाऱ्यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
इंजिन परफॉर्मेंस आणि मायलेज : रेनो ट्रायबरमध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे सुमारे 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन त्याच्या सुरळीत ड्रायव्हिंगसाठी ओळखले जाते आणि दररोज शहरी ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे. ते मॅन्युअल आणि एएमटी ऑटोमॅटिक दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. मायलेजच्या बाबतीत, ट्रायबर सुमारे 17 ते 20 किमी/लीटर वेग देते, जे या सेगमेंटमधील 7-सीटर कारसाठी खूप चांगले आहे.
advertisement
advertisement









