अनंत चतुर्दशीचे धार्मिक महत्त्व - अनंत चतुर्दशीला 'अनंत चौदस' असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. 'अनंत' या शब्दाचा अर्थ 'ज्याचा अंत नाही' असा आहे. भगवान विष्णूला अनंत शक्ती आणि निरंतरतेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवसाचे महत्त्व पांडवांच्या कथेमध्ये देखील सांगितले आहे. जेव्हा दुर्योधनाने पांडवांचे सर्व काही हिरावून घेतले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला होता. या व्रतामुळे पांडवांना त्यांचे हरवलेले राज्य आणि वैभव परत मिळाले.
advertisement
सार्वजनिक गणेश विसर्जन - गणेशोत्सव अनंत चतुर्दशीच्या दिवशीच समाप्त होतो. या दिवशी भक्त मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत गणेश मूर्तींना निरोप देतात. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त पाळणे गरजेचे असते. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर विसर्जन करू शकता. किमान खालील मुहूर्तांवर मूर्ती जागेवरून हलवणं आवश्यक आहे.
सकाळचा मुहूर्त: सकाळी 7:36 ते 9:10
दुपारचा मुहूर्त: दुपारी 1:54 ते 5:03
संध्याकाळचा मुहूर्त: सायंकाळी 6:37 ते 8:03
गणेश विसर्जन विधी -
गणेश विसर्जन करण्यापूर्वी काही विशिष्ट विधी पाळल्या जातात. विसर्जन करण्यापूर्वी गणपती बाप्पाची उत्तरपूजा केली जाते. यामध्ये बाप्पाला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई आणि इतर नैवेद्य अर्पण केले जातात. बाप्पाची आरती केली जाते आणि पुढील वर्षी लवकर परत येण्यासाठी प्रार्थना केली जाते. 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणून बाप्पाला निरोप दिला जातो.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं अधोगतीचे कारण, प्रगतीच्या वाटेत विघ्न येतं
मूर्तीवरील फुले, हार आणि इतर सजावटीचे साहित्य काढले जाते. पण, सद्या पर्यावरणाची काळजी घेऊन हे निर्माल्य पाण्यात न टाकता, त्याचे कंपोस्ट खत बनवण्यासाठी वापरले पाहिजे किंवा योग्यरित्या त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. विसर्जनासाठी शक्यतो पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा किंवा विसर्जन टाक्यांचा वापर केला जातो. मूर्ती हळूवारपणे पाण्यात विसर्जित करावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) च्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने, त्यांचा वापर टाळावा. अशा पद्धतीने गणेश विसर्जन विधी करू शकता.
लॉस अपयश मानसिक ताण..! सगळ्यातून बाहेर पडणार; चतुर्ग्रही योग 3 राशींना लकी ठरेल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)