'मेष ही मंगळाची रास आहे. या राशीची व्यक्ती कोणतीही गोष्ट विचार न करताच करून मोकळी होते. असे असले तरी जी गोष्ट करण्यासाठी मेष राशीच्या व्यक्ती घाबरतात तीच गोष्ट करा. तुम्हाला यश प्राप्ती होईल. हा महिना उत्साहवर्धक असून या राशीच्या व्यक्तींना अनुकूल आहे,' असं गोरे यांनी सांगितलं.
वास्तुशास्त्रातील या चुका देतात दारिद्र्याला आमंत्रण, पती-पत्नीत होतो विसंवाद
advertisement
मेष राशीच्या मंडळींना बुध वक्री आहे. तर शुक्र 3 सप्टेंबर रोजी मार्गी लागणार आहे. गुरू 4 सप्टेंबर रोजी वक्री होत असून शनी देखील सप्टेंबर महिन्यात वक्री राहणार आहे.17 सप्टेंबरला रवी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींचा उत्साह वाढणार आहे. मंगळ देखील षष्ठ स्थानात असल्याने अचानक धनलाभ होणार आहे.
या महिन्यात मेष राशीच्या व्यक्ती परिश्रमातून शत्रूवर मात करणार आहेत. घरातील वडील धाऱ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. वाहन चालवताना सावकाश आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवहार करताना कायदेशीर बाबींचा विचार करा, असा सल्लाही गोरे यांनी दिला.
वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण कधी? 5 राशीच्या लोकांसाठी अमंगळ?
बुध 7 ऑगस्टला सिंह राशीत प्रवेश करत आहे. नोकरीत नवी संधी उपलब्ध होईल. दुर्लक्ष करू नका. व्यापार धंद्यात अर्थप्राप्ती होईल. पती पत्नी मध्ये गैरसमज निर्माण होतील. मात्र त्यावर तोडगाही निघेल. जागेचे व्यवहार आणि वाहन खरेदीचा योग आहे. 17 सप्टेंबरनंतर मनावरील दडपण कमी होईल. तरुणांनी शरीराकडे दुर्लक्ष करू नये, असं भविष्य गोरे यांनी सांगितलं.
शुभ तारखा : सप्टेंबर महिन्यात 8, 9,15,16, 17, 25, 26, 27 हे शुभ दिवस आहेत. तर 1, 2, 10, 11, 12, 20,21,29 ,30 या तारखांना महत्त्वाची कामे करू नका, असं गोरे गुरुजींनी सांगितलं.
श्रावण महिना सुरू झाला असून सप्टेंबर महिन्यात गणेशाचे आगमन होणार आहे. या महिन्यात अनेक योग तसेच ग्रहांची युती होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच सर्व गोष्टी शांततेत विचार करून केल्या तर मेष राशीच्या व्यक्तींना हा महिना लाभदायक जाईल अशी माहिती गोरे यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





