TRENDING:

Shravan 2025: श्रावण शिवरात्रीला शुभ योगायोग! या पद्धतीनं केलेली पूजा महादेवापर्यंत पोहचते, शुभफळ

Last Updated:

Shravan 2025: श्रावण महिन्याची मासिक शिवरात्री गुरुवारी 21 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : श्रावण महिना शिवपूजेसाठी अत्यंत शुभ आणि फळदायी मानला जातो. येत्या शनिवारी पिठोरी अमावस्येनं श्रावण महिना संपेल, पण त्या आधी गुरुवारी मासिक शिवरात्री साजरी होणार आहे. सध्या सगळे श्रावण सोमवार संपले असताना शिवभक्तांना भोलेनाथांना प्रसन्न करण्याची यानिमित्तानं संधी मिळणार आहे. मासिक शिवरात्री ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि उपवास केल्याने विशेष लाभ होतो, असे मानले जाते.
News18
News18
advertisement

श्रावण महिन्याची मासिक शिवरात्री गुरुवारी 21 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. मासिक शिवरात्रीचे व्रत केल्याने व्यक्तीला नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते आणि मन शांत होते. ज्यांच्या विवाहात किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, त्यांनी हे व्रत केल्यास वैवाहिक जीवन सुखी होते. भगवान शिव दयाळू मानले जातात. मासिक शिवरात्रीला केलेल्या सत्कर्मांचे विशेष फळ मिळते.

advertisement

मासिक शिवरात्री पूजा विधी -

मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर (सूर्योदयापूर्वी) उठावे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास पांढरे वस्त्र घालावे. पूजा सुरू करण्यापूर्वी हातात थोडे पाणी आणि तांदूळ घेऊन मासिक शिवरात्रीच्या व्रताचा संकल्प घ्यावा. पूजास्थानी एक स्वच्छ पाट ठेवून त्यावर भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. शिवलिंग असल्यास ते पाटावर ठेवावे. शिवलिंगाला जल, दूध, दही, मध, तूप, साखर (पंचामृत) आणि गंगाजल यांनी अभिषेक करावा. अभिषेकानंतर शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, भांग, पांढरी फुले, चंदन, अक्षता, आणि बिल्वपत्र अर्पण करावे. बेलपत्रावर चंदन किंवा कुंकू लावून 'ॐ नमः शिवाय' लिहून ते अर्पण केल्यास अधिक पुण्य मिळते. 'ॐ नमः शिवाय' किंवा 'महामृत्युंजय मंत्रा'चा 108 वेळा जप करावा. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करावी. फळे, मिठाई किंवा सात्त्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.

advertisement

मासिक शिवरात्रीचा उपवास ठेवावा. रात्री पूजा करून फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करावी आणि त्यानंतर उपवास सोडावा. या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणांना अन्न आणि वस्त्र दान करणे शुभ मानले जाते.

श्रावणाचा शेवट शनी अमावस्येनं! साडेसाती-शनिदोषाचा त्रास टाळण्याची सुवर्णसंधी

मासिक शिवरात्रीचा उपवास केल्यास शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर सकारात्मक परिणाम दिसून येतात असे मानले जाते. त्यामुळे, महाशिवरात्रीप्रमाणेच मासिक शिवरात्रीलाही विशेष महत्त्व दिले जाते.

advertisement

शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावण शिवरात्रीला शुभ योगायोग! या पद्धतीनं केलेली पूजा महादेवापर्यंत पोहचते, शुभफळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल