८ ऑगस्ट रोजीच भद्रकाळाची अशुभ छाया संपेल, त्यामुळे रक्षाबंधन दिवशी भद्रकाळ नाही. त्यामुळे सूर्योदयापासून दुपारी १:२६ पर्यंतचा काळ राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ काळ असेल. यासोबतच अभिजीत मुहूर्तात (११:५९ ते १२:५३) राखी बांधणे देखील खूप शुभ मानले जाईल. ज्यांना दुपारपर्यंत राखी बांधणं शक्य होणार नाही, ते संध्याकाळीही राखी बांधू शकतात. कारण पौर्णिमा तिथी उदयतिथीमध्ये अडीच तासांपेक्षा जास्त काळ राहील. त्यामुळं संध्याकाळीही राखी बांधणे चुकीचं ठरणार नाही.
advertisement
रक्षाबंधनाचा शुभ योग
यावेळी रक्षाबंधन दिवशी सौभाग्य आणि शोभन नावाचे दोन शुभ योग असतील. यासोबतच, या दिवशी सर्वार्थसिद्धी योग देखील तयार होईल. या शुभ योगांमुळे, रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधणेच शुभ असेलच शिवाय या दिवशी इतर शुभ कामे देखील करता येतील.
धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधन हा मुळात रक्षासूत्राशी संबंधित सण आहे. प्राचीन काळी, ऋषींनी त्यांचे जप, ध्यान इत्यादींचे रक्षण करण्यासाठी राजांना रक्षासूत्र बांधले होते. जेणेकरून ते ऋषींचे ध्यान, यज्ञ इत्यादींचे रक्षण करू शकतील. राजांनी ऋषींना सर्व प्रकारचे संरक्षण दिले. नंतर ही परंपरा भावांमध्येही लोकप्रिय झाली आणि बहिणींनी आपल्या भावांना रक्षासूत्र बांधण्यास सुरुवात केली. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.
महाराष्ट्रात रक्षाबंधनाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. याच दिवशी नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. नारळी पौर्णिमा विशेषतः कोळी बांधवांसाठी आणि समुद्राशी संबंधित लोकांसाठी महत्त्वाची असते. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते, जेणेकरून तो शांत राहो आणि आपली उपजीविका सुरक्षित राहो. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण अधिक समृद्ध आणि विविध पैलूंनी भरलेला असतो.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
