डॉ. श्रीपती त्रिपाठी यांनी याआधी केलेली काही भाकितं खरी ठरली आहेत. बिहारमधील प्रमुख नेत्यांच्या कुंडली आणि ग्रहस्थितींचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी भाकीत केलं आहे की या निवडणुकीत बदलाचे वारे दिसतील. मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल. बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.
advertisement
डॉ. श्रीपती त्रिपाठी यांनी सांगितलं की, "नोव्हेंबर 2025 मध्ये शनी मीन राशीत, गुरु कर्क राशीत आणि राहू कुंभ राशीत आहे. ग्रहांची ही स्थिती सत्तेतील बदल दर्शवते. जुने चेहरे मागे हटताना दिसत आहेत, तर नवीन नेते उदयास येत आहेत. हे 2025 च्या निवडणुकीत मोठ्या उलथापालथीची शक्यता दर्शवते.
डॉ. श्रीपती त्रिपाठी यांनी सांगितलं की, भाजप मजबूत रणनीतीसह निवडणुकीच्या रिंगणात आहे, पण तेजस्वी यादव यांची ग्रहस्थिती देखील बरीच मजबूत आहे, जी त्यांना सत्तेच्या उंबरठ्याजवळ येण्याचे संकेत देते. तेजस्वी यादव यांच्या ग्रहांच्या हालचालींवरून असं दिसून येतं की ही त्यांच्यासाठी संधी असू शकते. पण पुढचा मार्ग आव्हानात्मक आहे.
पुढे ते म्हणाले, "नितीश कुमार यांना व्यापक अनुभव आहे, पण राहूचा प्रभाव त्यांना किंग किंवा किंगमेकर म्हणून उभं करू शकतो. नितीश कुमार कोणालाही सत्तेवर आणू शकतात. गुरु ग्रहाची ताकद आणि जनतेचा पाठिंबा त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्यास सक्षम बनवतो असं दिसतं. शनि आणि राहू भाजप नेत्याला काही संधी देतील, पण पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी चमत्काराची आवश्यकता असेल. कदाचित त्यांच्याकडे सत्तेची गुरुकिल्ली स्वतःकडे नसेल"
तुरुंगातील उमेदवाराच्या विजयाचा जश्न; 1 लाख लोकांसाठी महाभोजन, 2 लाखांपेक्षा जास्त रसगुल्ले
यावेळी बिहारमध्ये लहान पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात. चिराग पासवान आणि कुशवाहासारखे नेते या शर्यतीत महत्त्वाचे ठरू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
एकंदर काय तर 2025 ची बिहार विधानसभा निवडणूक केवळ मतांचा खेळ नसून ग्रह, युती आणि गणितांची लढाई असेल. ग्रहांच्या जुळणीवरून असं दिसून येतं की तेजस्वी यादव सत्तेच्या सर्वात जवळ आहेत. नितीश कुमार यांची भूमिका निर्णायक असेल. भाजपला धोरणात्मक पातळीवर कठोर संघर्ष करावा लागेल.
