पंचांगानुसार, वर्ष 2025 मध्ये 9 डिसेंबरला शुक्र ग्रह अस्त अवस्थेत जाईल आणि वर्ष 2026 मध्ये 3 फेब्रुवारीपर्यंत अस्तच राहील. यामुळे विवाहाचे मुहूर्त मिळणार नाहीत. विवाह मुहूर्तांसाठी बृहस्पती (गुरू) आणि शुक्र हे दोन्ही ग्रह उदित असणं आवश्यक मानलं जातं. त्यामुळे शुक्र उदित झाल्यावर 4 फेब्रुवारी 2026 पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होतील.
advertisement
दरम्यान, वर्ष 2025 मध्ये नोव्हेंबरपासूनच विवाह मुहूर्त सुरू होतील. या अनुषंगाने, वर्ष 2026 मधील विवाह मुहूर्त आणि वर्ष 2025 मधील उर्वरित महिन्यांचे विवाह मुहूर्ताच्या तारखा काय आहेत, ते जाणून घेऊया.
वर्ष 2026 मध्ये विवाहाच्या शुभ तिथी -
फेब्रुवारी 2026 - 5, 6, 8, 10, 12, 14, 19, 20, 21, 24, 25 आणि 26
मार्च 2026 - 1, 3, 4, 7, 8, 9, 11 आणि 12
एप्रिल 2026 - 15, 20, 21, 25, 26, 27, 28 आणि 29
मे 2026 - 1, 3, 5, 6, 7, 8, 13 आणि 14
जून 2026 - 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 29
जुलै 2026 - 1, 6, 7 आणि 11
नोव्हेंबर 2026 - 21, 24, 25 आणि 26
डिसेंबर 2026 - 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मधील शुभ विवाह तिथी
वर्ष 2025 मध्ये चातुर्मास संपल्यानंतर नोव्हेंबर 2025 पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होतील. जगाचे पालनकर्ता भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला योगनिद्रेतून जागे होतील आणि यासोबतच सर्व शुभ कार्ये सुरू होतील. त्याचप्रमाणे विवाहासारखी शुभ कार्येही केली जातील.
नोव्हेंबर 2025 - 2, 3, 5, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25, 30
डिसेंबर 2025 - 4, 5, 6
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
