वास्तुशास्त्रानुसार, तुमची पुसण्याची दिशा आणि पद्धत योग्य असेल तर घरात चांगलं वातावरण राहतं. शिवाय घरातील तिजोरीही नेहमी पैशांनी भरलेली राहते. पोछा मारण्याची चुकीची पद्धत घरात पैशाचे नुकसान आणि मानसिक ताणही वाढू शकतो. ज्योतिषी डॉ. गौरव दीक्षित यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या चार दिशांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिशा एका विशेष उर्जा वास करते. संपत्ती आणि समृद्धीच्या दृष्टिकोनातून, उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते, कारण ही दिशा संपत्तीची देवता असलेल्या कुबेराची दिशा मानली जाते. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे, ती जीवन ऊर्जा आणि प्रगतीचे प्रतीक आहे. यासाठी नेहमीच फरशी पुसताना खोलीच्या नैऋत्य दिशेकडून ईशान्य दिशेकडे जावे.
advertisement
थोडी नव्हे खूप दिवस वाट पाहिली! या राशींचा आता सुवर्णकाळ; शनीकडून कष्टाचं शुभफळ
याप्रकारे फरशी पुसायला सुरुवात केल्यास त्याचे शुभ परिणाम दिसू लागतात. नैऋत्य कोपऱ्यातून ईशान्य कोपऱ्याकडे पुसत गेल्यास वाईट शक्ती घरातून बाहेर पडतात आणि संपत्तीशी संबंधित शुभ ऊर्जा घरात प्रवेश करते. यामुळे मानसिक शांती आणि घरातील लोकांमध्ये परस्पर समन्वय सुधारतो, असे मानले जाते.
फरशी पुसण्यासाठीचा पोछा फार देव्हाऱ्याजवळ नेऊ नये, पैसे ठेवलेल्या तिजोरीजवळ नेऊ नये. ही ठिकाणे शुद्ध आणि स्वच्छ ठेवली पाहिजेत. पोछा मारण्याच्या पाण्यात थोडे मीठ किंवा गोमूत्र टाकले तर ते अधिक प्रभावी मानले जाते. मीठ नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचे काम करते आणि वातावरण शुद्ध होते. आठवड्यातून किमान एकदा मिठाच्या पाण्याने पुसणे आवश्यक आहे, विशेषतः मंगळवार आणि शनिवारी, कारण हे दोन दिवस नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी विशेष मानले जातात. अशाप्रकारे, वास्तुशास्त्रानुसार फरशी पुसण्याची पद्धत वापरून परिणाम पाहु शकता.
शनि जयंतीच्या अगोदर दुप्पट लाभ! सूर्यदेव नक्षत्र बदलणार, फायदा 4 राशींना होणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)