TRENDING:

Daily Numerology: सोडून द्यावं वाटत असताना आशेचा किरण! या 3 मूलांकाना आज योग्य धागा सापडणार

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

सुख-शांतीसाठी झगडावे लागेल, आज घरात शांतता राखण्याचं मोठं आव्हानं तुमच्यासमोर असेल. व्यवहारांमध्ये काळजी घ्यावी लागेल. आज तुमची फसवणूक होऊ शकते, सावध राहा. कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त खबरदारी घ्या. ऑफिसमध्ये वाद झाल्यानं तुम्हाला त्रास होऊ शकतो, काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराचं म्हणणं पटत नसलं तरीही शांतपणे ऐकून घ्या. वाद शमण्यास होण्यास मदत होईल.

advertisement

Lucky Colour : Magenta

Lucky Number : 2

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

अधिकचं अनुभवाचं ज्ञान मिळेल, म्हणजे आज कामात वरिष्ठांकडून खूप काही मिळेल. पण, आजचा दिवस अनिश्चिततेचा आहे. सावध राहा. कारण एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. एखाद्या अतिशय आकर्षक व्यक्तीशी तुमचं नातं जोडलं जाऊ शकते. त्यासाठी वेळ अनुकूल आहे.

advertisement

Lucky Colour : Indigo

Lucky Number : 4

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

छोट्या लाभासाठी भविष्यात अडचणी निर्माण होतील अशी कामं टाळा. संमिश्र भावनांमुळे आजचा दिवस गोंधळात राहील. आज विविध मार्गांनी उत्पन्न चांगलं मिळेल. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. कारण आता पैशांची बचत करण्याची वेळ आलीच आहे, ती तुम्हाला भविष्यात अडचणीच्या काळात उपयुक्त ठरेल. जोडीदाराशी असणारे मतभेत दूर होऊन नात्यातील प्रेमाची भावना वाढेल.

advertisement

Lucky Colour : Pink

Lucky Number : 11

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामांची दखल घेतली जाईल, ऑफिसमध्ये तुम्ही करीत असलेल्या कामाचा वरिष्ठांकडून सहानुभूतीपूर्वक विचार होईल. नवीन ज्ञान मिळण्यासाठी प्रयत्न कराल. आज पुस्तक वाचण्यास प्राधान्य देऊ शकता. तुमचं आरोग्य चांगले राहील. आर्थिकदृष्ट्या व्यवसायातून चांगली बातमी मिळेल. मनोबल वाढवण्यासाठी फिरायला जाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.

advertisement

Lucky Colour : White

Lucky Number : 17

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस खास असू शकतो कारण, तुम्ही जे काम हाती घ्याल ते सहज पूर्ण होईल. नशिबात चढ-उतार पाहण्यास मिळतील. एखाद्या कामाबाबतीत इतरांवर अवलंबून राहाल. काही वाहन खरेदी करण्यासाठी चांगली वेळ आहे. तुमची मानसिक ऊर्जा खूप चांगली राहील. संवाद कौशल्य सुधारेल. जोडीदार व तुमच्यात काही गोष्टींवर मतभेत होऊ शकतात. अशा परिस्थितीत जोडीदाराचे बोलणे व्यवस्थित ऐकण्याचा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, फायद्याचं ठरेल.

Lucky Colour : Blue

Lucky Number : 18

माहेर असो की सासर! नाकाजवळ इथं तीळ असलेल्या महिला पूर्ण कुटुंबाला श्रीमंत बनवतात

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बाहेर अचानक प्रवासाचा योग जुळून येऊ शकतो. कला, साहित्य आणि संगीतात रूची राहील. विरोधकांपासून सावध राहा. विरोधकांमध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे समजल्यानं हादरा बसेल. व्यवसायात शत्रुत्वाचा सामना करावा लागेल. मात्र तुमची प्रगती होईल. प्रेमाच्या बाबतीत तुमचा विनाकारण काटकसर करण्याचा स्वभाव तुमच्या आणि जोडीदाराच्या नात्यामध्ये अंतर आणू शकतो, काळजी घ्या.

Lucky Colour : Brown

Lucky Number : 6

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कुटुंबातील आपली किंमत नसल्यासारखं वाटू शकतं, पण आज इतरांना तुमची किंमत कळेल. आज तुमची एखादी हरवलेली गोष्ट मिळू शकते. ऑफिसमध्ये कामाचा दबाव असताना शांत राहण्याचा तुमचा स्वभाव तुमच्या सहकाऱ्यांना प्रभावित करेल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराला त्रास होईल असं वागू नका. अन्यथा नात्यात दूरावा येईल.

Lucky Colour : Green

Lucky Number : 5

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामाचा दिवस आहे. तुमची जीवनशैली इतरांना प्रभावित करेल. त्वचेची समस्या उद्भवल्यास एखाद्या चांगल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. एखादी प्राचीन वस्तू मिळाल्यानं आर्थिक फायदा होईल. प्रेमाच्या बाबतीत दिवस फारसा चांगला नाही, त्यामुळे नातेसंबंधामध्ये काळजी घ्या.

Lucky Colour : Coffee

Lucky Number : 15

चित्रा नक्षत्रात बुध गोचर! आशा-अपेक्षा सोडलेली असताना या 3 राशींचे भाग्य उजळणार

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

अति आत्मविश्वास कामाचा नाही, आज तुम्ही जे काही काम हाती घ्याल, ते संयमानं आणि दृढनिश्चयानं पूर्ण करा, फायद्याचं राहील. तुमचा मूड उत्साहपूर्ण राहील. ज्ञानाचा आणि बुद्धिचा वापर केल्यानं करिअरसाठी फायदा होईल. आज तुमच्या मूल्यांवर ठाम आहात ना, याचा विचार करून योग्य निर्णय घ्या.

Lucky Colour : Orange

Lucky Number : 7

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Daily Numerology: सोडून द्यावं वाटत असताना आशेचा किरण! या 3 मूलांकाना आज योग्य धागा सापडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल