धातूचे कासव - वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीपूर्वी घरात धातूचे कासव आणणे खूप शुभ मानले जाते. धातूचे कासव आणल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मी-भगवान विष्णूची कृपा कायम राहते, असे म्हणतात. कासव घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला (ईशान कोण) ठेवावे. या दिशेमुळे घरात आर्थिक स्थिरता, समृद्धी येते आणि पैशाची स्थिती सुधारते. याशिवाय, धातूचे कासव दीर्घायुष्य आणि शक्तीचे प्रतीक आहे.
advertisement
नारळ - वास्तुशास्त्रानुसार, नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. परंपरेनुसार, दिवाळीपूर्वी केसर असलेला नारळ घरात नक्की आणावा आणि तो घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा.
सिंह कन्या तूळ वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; आनंद वार्ता सण द्विगुणित करेल
तुळशीचे रोपटे - जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल, तर दिवाळीपेक्षा चांगला दिवस तुळस आणण्यासाठी दुसरा नाही. तुळस ही वातावरण शुद्ध करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि चांगले आरोग्य व आनंद घरात आणण्यासाठी ओळखली जाते. दिवाळीपूर्वी आपल्या घराच्या ईशान्य दिशेला (उत्तर-पूर्व) तुळशीचे रोपटे लावावे. तुळशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या संबंधाचे प्रतीकही मानले जाते. दिवाळीपूर्वी घरात तुळस ठेवल्यास आध्यात्मिक आणि आर्थिक, अशा दोन्ही प्रकारची समृद्धी येते.
केरसुणी/झाडू - दिवाळीपूर्वी नवीन केरसुणी किंवा झाडू आणणे देखील खूप लाभदायक मानले जाते. असे म्हणतात की नवीन झाडू विकत घेऊन घरी आणल्यानं घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदते आणि घरातून दारिद्र्य दूर होते.
दिवाळी 2025 चे शुभ संयोग - ज्योतिष्यांच्या मते, यावर्षीची दिवाळी खूप दुर्मीळ मानली जात आहे. कारण, 100 वर्षांनंतर या दिवाळीला त्रिग्रही योग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. यासोबतच, दिवाळीच्या दिवशी पूजेसाठी प्रदोष काल आणि वृषभ काल हे शुभ मुहूर्त देखील मिळतील.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)