धनत्रयोदशीला मिठाचे उपाय: धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या दारात मीठ मिश्रित पाणी शिंपडावे. वास्तू शास्त्रानुसार हा उपाय केल्यानं घरातील दरिद्रता दूर होते. हा सोपा उपाय तुमच्या जीवनात आर्थिक संपन्नता घेऊन येतो, तसेच घरातील लोकांमध्ये संतुलन टिकून राहते.
मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे: धनत्रयोदशीच्या सकाळी तुम्ही घरात मीठ मिश्रित पाण्याच्या पोछा (फरशी पुसणे) अवश्य लावावा. हा सोपा उपाय घरात असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो. वास्तू शास्त्रानुसार, हा उपाय केल्याने ग्रहांचा वाईट परिणामही तुमच्यावरून कमी होतो.
advertisement
मीठ खरेदी करणे: तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा व्हावी, असे तुम्हाला वाटत असेल, तर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तुम्ही मीठ खरेदी देखील केले पाहिजे. या दिवशी मीठ खरेदी केल्याने माता लक्ष्मी कृपा करते आणि तुम्हाला धन-धान्याची प्राप्ती होते.
जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अॅटिट्यूड दाखवतात
मिठाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी: या उपायांव्यतिरिक्त मिठाशी संबंधित काही खास गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही कोणाकडून मीठ उधार घेऊ नये आणि कोणाला उधार देऊ नये. तुम्ही असे केले, तर धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होऊ शकते आणि तुमच्या जीवनात पैशांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)