काळ्या रंगाच्या गोष्टी - वास्तू आणि शास्त्रांमध्ये काळा रंग निगेटिव्ह उर्जेचे प्रतीक मानला जातो. रक्षाबंधनासारख्या शुभ दिवशी काळा ड्रेस, बूट, पर्स किंवा कोणतीही काळ्या रंगाची वस्तू भेट देऊ नये. यामुळे नात्यांमध्ये अंतर, गैरसमज आणि तणाव वाढू शकतो. काळा रंग राहू-केतूचा प्रतिनिधी मानला जातो, ज्यामुळे मानसिक शांती मिळू शकणार नाही.
गुलाबी, पिवळा, पांढरा किंवा निळा असे हलके आणि चमकदार रंग प्रेम आणि शांतीचे प्रतीक आहेत. या रंगांचे कपडे किंवा अॅक्सेसरीज भेट देणे योग्य ठरेल.
advertisement
घड्याळ - जरी आजकाल घड्याळ ही एक स्टायलिश आणि उपयुक्त भेट मानली जात असली तरी काही परंपरा आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार, घड्याळ काळाच्या ओघाचे किंवा त्याच्या समाप्तीचे प्रतीक मानले जाते. घड्याळ भेटवस्तू म्हणून दिल्यानं नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्याऐवदी तुम्ही एक सुंदर ब्रेसलेट, पैंजण किंवा अंगठी भेट देऊ शकता.
पैसे - रक्षाबंधनासारख्या भावनिक सणावर फक्त पैसे देणं हे थोडं असंवेदनशील मानलं जाऊ शकतं. म्हणजे भेटवस्तू निवडण्यात तुम्ही कोणतेही वैयक्तिक प्रयत्न केलेले नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या बहिणीला यामुळे असे वाटू शकते की हे नाते औपचारिकतेपुरते मर्यादित आहे.
95 वर्षांनी रक्षाबंधन दिवशी असा शुभ संयोग; नारळी पौर्णिमा 2 दिवस असल्यानं..
आरसा - वास्तूमध्ये आरसा ही एक अतिशय संवेदनशील वस्तू मानली जाते. रक्षाबंधनसाठी आरसा भेट दिल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. बहिणीच्या कुंडलीत चंद्र किंवा राहूची स्थिती असल्यास, यामुळे कलह निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी एक सुंदर फोटो किंवा भिंतीवरील कलाकृती द्या, ज्यामुळे घराचे सौंदर्य वाढेल आणि सकारात्मकता देखील वाढेल.
मोत्यासारखे दिसणारे नकली दागिने - मोती हे दुःख आणि अश्रूंचे प्रतीक मानले जातात. मोती विशेषतः अविवाहित मुलींना भेट देणं शुभ ठरणार नाही. तुम्ही त्याऐवजी चांदीचे दागिने देऊ शकता, ते सुंदर आणि शुभ देखील मानले जातात.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
