Raksha Bandhan 2025: तब्बल 95 वर्षांनी रक्षाबंधन दिवशी असा शुभ संयोग; नारळी पौर्णिमा 2 दिवस असल्यानं राखी बांधताना..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Raksha Bandhan २०२५: यंदा २०२५ मध्ये रक्षाबंधन दिवशीचे नक्षत्र, तिथी, राखी बांधण्याची शुभ वेळ, पौर्णिमा तिथीचा आरंभ आणि समाप्ती जवळजवळ १९३० सालच्या रक्षाबंधनासारखीच आहे. त्यामुळे..
मुंबई : दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला राखीचा यंदा ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. यावर्षी रक्षाबंधन दिवशी शुभ योगायोग घडत आहे, ज्यामुळे राखीचा सण आणखी खास बनला आहे. या दुर्मीळ योगात शुभ मुहूर्तावर राखी बांधण्याची संधी मिळणार आहे..
रक्षाबंधन दुर्मीळ योगात -
यंदा २०२५ मध्ये रक्षाबंधन दिवशीचे नक्षत्र, तिथी, राखी बांधण्याची शुभ वेळ, पौर्णिमा तिथीचा आरंभ आणि समाप्ती जवळजवळ १९३० सालच्या रक्षाबंधनासारखीच आहे. त्यामुळे ज्योतिषी हा एक दुर्मिळ योगायोग मानत आहेत. १९३० मध्ये रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरे करण्यात आले होते आणि तो दिवसही शनिवार होता. त्याचप्रमाणे २०२५ मध्ये रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी आहे आणि यावर्षीही रक्षाबंधन शनिवारी आहे. १९३० मध्ये श्रावण पौर्णिमा आणि २०२५ मधील श्रावण पौर्णिमा सुरू होण्याची वेळ देखील जवळजवळ सारखीच आहे. १९३० मध्ये सौभाग्य योग आणि श्रवण नक्षत्र होते, ते या वर्षी देखील आहे. म्हणूनच ज्योतिषी हा एक अतिशय दुर्मीळ योगायोग मानत आहेत.
advertisement
रक्षाबंधन दिवशी कोणते शुभ योगायोग - रक्षाबंधन दिवशी सौभाग्य, सर्वार्थ सिद्धी, बाव आणि बलव नावाचे शुभ योगायोग तयार होणार आहेत. या शुभ योगांमध्ये राखी बांधण्यासोबतच देवाची पूजा करणे आणि दान करणे देखील खूप शुभ मानले जाते.
advertisement
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त - १९३० नंतर पहिल्यांदाच विशेष शुभ योगात आलेल्या रक्षाबंधनचा शुभ मुहूर्तावर राखी बांधून फायदा घ्यावा. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची अशुभ छाया नाही, त्यामुळे राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ राहील. पण, तरी दिवसातील सर्वात शुभ मुहूर्त काढायचा झाल्यास ९ ऑगस्ट रोजी पहाटे ५:२१ ते १:२४ पर्यंतचा वेळ राखी बांधण्यासाठी खूप शुभ ठरेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Raksha Bandhan 2025: तब्बल 95 वर्षांनी रक्षाबंधन दिवशी असा शुभ संयोग; नारळी पौर्णिमा 2 दिवस असल्यानं राखी बांधताना..


