पूर्वजांचा आशीर्वाद - असे मानले जाते की, पितृपक्षात जन्मलेल्या मुलांवर त्यांच्या पूर्वजांचा विशेष आशीर्वाद असतो. अनेकदा ही मुले त्याच कुळातील एखादे पूर्वज पुन्हा जन्म घेऊन आले आहेत, असे मानले जाते. त्यामुळे, त्यांच्यावर कुटुंबाची विशेष जबाबदारी असते आणि ते नेहमीच कुटुंबाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतात, असं मानलं जातं.
बुद्धिमत्ता आणि ज्ञान - या काळात जन्मलेली मुले खूप लवकर समजदार बनतात. त्यांच्या वयापेक्षा अधिक मॅच्युअर आणि बुद्धिमान असतात. त्यांच्यात ज्ञान मिळवण्याची नैसर्गिक आवड असते आणि ते त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर समाजात आणि कामाच्या ठिकाणी उच्च स्थान प्राप्त करतात. त्याचा साहजिकच कुटुंबाला फायदा होतो.
advertisement
मेहनती आणि ध्येयवेधी - पितृपक्षात जन्मलेली मुले केवळ नशिबावर अवलंबून राहत नाहीत. ती खूप मेहनती आणि परिश्रमी असतात. त्यांची ध्येये स्पष्ट असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही अडचणींना घाबरत नाहीत. कामावर निष्ठा असते. या लोकांचा स्वभाव खूप आनंदी आणि उत्साही असतो. त्यांच्या असण्यामुळं घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. ते स्वतःच्या आनंदात इतरांनाही सामील करून घेतात.
भलताच त्रास सोसावा लागला! या 5 राशींचे आता भाग्य उजळणार; गुरू-राहुमुळे अर्थलाभ
कुटुंबाशी नातं - या लोकांचे आपल्या कुटुंबाशी खूप घट्ट नातं असतं. ते आपल्या कुटुंबातील लोकांना खूप महत्त्व देतात आणि त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सोबत असतात. एकूणच पितृपक्षात जन्मलेली मुले कुटुंबासाठी भाग्यवान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. घरात या काळात एखाद्या बाळाचा जन्म झाला असेल, तर तो पूर्वजांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो.
यंदाच्या पितृपक्षात तरी चूक सुधारा! मयत व्यक्तींचे फोटो घरात या दिशेला लावणं शुभ
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)