TRENDING:

Monthly Horoscope: नव्या वाटा शोधाव्या लागणार! फेब्रुवारी महिना या राशींना अनलकी, धनहानीचे संकेत

Last Updated:

Monthly Horoscope, February 2025: फेब्रुवारी महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं मासिक राशीभविष्य वर्तवलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं मासिक राशीभविष्य जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मेष (Aries) : महिना ऊर्जा आणि प्रेरणेने भरलेला असेल. तुमचा आत्मविश्वास आणि उद्योजकता यांना नवा पैलू मिळेल. आज तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घेण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. त्याचा इतरांवर प्रभाव पडू शकेल. बिझनेसमध्ये काही नव्या सूचना मिळू शकतात. त्या तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यास मदत करतील. टीममधल्या संवादामध्ये अडथळा येऊ देऊ नका. सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये परस्परांना समजून घेणं वाढवण्याची संधी आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. सोशल लाइफ वाढण्याची शक्यता आहे. मित्रांसह आनंद देणारे कार्यक्रम ठरवू शकता. गेल्या काही दिवसांपासून थकल्यासारखं वाटत असल्यास आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. ध्यानधारणा आणि व्यायाम फायदेशीर ठरेल. महिना सकारात्मकतेने भरलेला असेल. जे काही कराल त्यात यशस्वी होण्यासाठी तयार राहा.
मेष - शेअर बाजारात किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते अजिबात करू नका. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कामात काही अडथळे येऊ शकतात. यासोबतच नोकरीतही अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा.

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मेष - शेअर बाजारात किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते अजिबात करू नका. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कामात काही अडथळे येऊ शकतात. यासोबतच नोकरीतही अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement

वृषभ (Taurus) : महिना सलोखा आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. योग्य दिशेने ऊर्जा लावून महत्त्वाची कामं पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचं कौतुक होईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. कुटुंबासह व्यतीत केलेला वेळ तुम्हाला आनंद देईल. नातेसंबंधांमधलं प्रेम आणि समर्पण वाढेल. जोडीदाराशी लहानसहान गोष्टीही शेअर करा. यामुळे नातं अधिक दृढ होईल. चैनीच्या, आरामाच्या बाबींसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या आज काही नव्या शक्यता समोर येऊ शकतात; पण मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या. यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने व्हाल. मनःशांती टिकवा आणि हलक्याफुलक्या उपक्रमांमध्ये वेळ व्यतीत करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल.

advertisement

मिथुन (Gemini) : महिन्यात मनोबल वाढलेलं असेल. सभोवतालच्या व्यक्तींशी चांगले नातेसंबंध प्रस्थापित करता येतील. विचारांमध्ये स्पष्टता आणि ऊर्जा असेल. त्यामुळे तुम्हाला नवे प्लॅन्स बनवता येतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. क्रिएटिव्हिटी वापरा. ती तुम्हाला नवीन दिशेने घेऊन जाईल. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. अधिक ताण घेऊ नका. संवाद हा मुख्य आधार असेल. त्यामुळे विचार आणि भावना शेअर करण्यास कचरू नका. नवी सुरुवात होण्याची शक्यता आहे.

advertisement

या कालसर्प दोषांमध्ये वैवाहिक जीवन होतं त्रस्त! हे आहेत सोपे उपाय, त्वरित करा...

कर्क (Cancer) : महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी समाधानकारक असेल. भावनिक खोली गाठण्याची क्षमता आज उपयुक्त ठरेल. कुटुंबीय आणि मित्रांसह वेळ व्यतीत केल्याने आनंद आणि समाधान मिळेल. जुन्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यास योग्य काळ आहे. त्यामुळे प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. संवेदनशीलतेमुळे इतरांबद्दल सहानुभूती वाढेल. त्यामुळे नाती अधिक दृढ होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा सहकार्याचा स्वभाव प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. कोणत्याही परिस्थितीत भावनांच्या आहारी जाऊ नका. सध्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी काही वेळ काढा. सकारात्मक विचार करा. येणाऱ्या आव्हानांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहा. ज्या गोष्टी कराल त्यात कमिटेड राहा आणि धीर सोडू नका. नवीन शक्यता शोधण्यासाठी हा योग्य काळ आहे.

advertisement

सिंह (Leo) : महिना तुमच्यासाठी उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन आव्हानांना सामोरं जाण्याची प्रेरणा मिळेल. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत केल्याने तुम्हाला फायदाच होईल. त्यांच्या पाठबळामुळे चांगले निर्णय घेण्यास मदत होईल. आज क्रिएटिव्हिटीला चालना मिळू शकते. काही तरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल. ती उपयुक्त ठरेल. करिअरच्या क्षेत्रात तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. योगदानाची दखल घेतली जाईल. कोणत्याही वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांतता राखणं महत्त्वाचं आहे, ध्यानधारणा आणि योगासनांमध्ये वेळ व्यतीत करा. शारीरिक सक्रियता खूप महत्त्वाची आहे. व्यायामात वेळ गुंतवा. यामुळे मन आणि शरीर दोन्ही ताजंतवानं होतील. एकंदरीत, आजचा दिवस ध्यानधारणा, क्रिएटिव्हिटी आणि सकारात्मक नातेसंबंधांचा आहे.

advertisement

कन्या (Virgo) : महिन्यात अनेक महत्त्वाच्या संधी येतील. कष्टांचं आणि निश्चयाचं फळ मिळेल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सुलभता असेल. कुटुंबासोबत व्यतीत केलेला वेळ आनंददायक असेल. कामाच्या बाबतीत प्रयत्न चांगली फळं देतील. त्यामुळे रिवॉर्ड्स किंवा रेकग्निशन मिळू शकतं. आरोग्याच्या दृष्टीने सक्रिय राहणं खूप महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिकदृष्ट्या नव्या प्लॅन्सवर विचारपूर्वक पुढे जा. आर्थिक नियोजनाबद्दल कुटुंबीयांशी चर्चा करणं फायद्याचं ठरू शकतं. विचारशक्ती आणि विश्लेषणक्षमतेमुळे आव्हानांना सामोरं जाल. स्वतःवर विश्वास ठेवून उद्दिष्टांकडे वाटचाल करा. सकारात्मकतेने पुढे जा आणि मन काय सांगतंय ते ऐका.

तूळ (Libra) : संवाद आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना आहे. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसह वेळ व्यतीत केल्याने भावना आणि विचार नव्या प्रकारे व्यक्त होतील. विचार शेअर करण्याची इच्छा होईल. त्यामुळे नातेसंबंध दृढ होतील. क्रिएटिव्हिटी सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे कला किंवा छंदामध्ये आपलं कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते; पण काळजीपूर्वक काम करून तुम्ही समस्यांवर मात करू शकाल. आरोग्यासाठी स्वतःला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा. हलका व्यायाम किंवा योगासनं मानसिक संतुलनासाठी उपयुक्त ठरतील. मानसिक थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या. आर्थिक बाबतीत संयम ठेवा आणि मोठ्या खर्चांपासून दूर राहा. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने चांगले फायदे मिळतील. चांगल्या संधी मिळतील. फक्त संयम राखा.

वृश्चिक (Scorpio) : महिना सकारात्मक असेल. स्वतःच्या भावना समजून घेऊन व्यक्त करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी ठरेल. नातेसंबंध अधिक सखोल करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे प्रियजनांशी जवळीक वाढेल. कामाच्या ठिकाणी नकारात्मकता टाळा आणि ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. तुमची ऊर्जा इतरांनाही प्रेरणा देईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आरोग्याच्या सवयींकडे लक्ष द्या. थोडा व्यायाम आणि चांगला आहार मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. तुमच्यामध्ये एक सुप्त शक्ती आहे. ती योग्य प्रकारे वापरल्यास कोणत्याही आव्हानांवर मात करू शकाल. परिस्थितीचा फायदा घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा.

धनू (Sagittarius) : धनू राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ऊर्जेने भरलेला काळ आहे. नव्या कल्पना आणि दृष्टिकोन विकसित कराल. ते तुम्हाला तुमच्या ध्येयांच्या दिशेने प्रेरित करतील. लोकांशी संवाद साधताना प्रामाणिक आणि स्पष्ट राहा. त्यामुळे तुमची नाती मजबूत होतील. क्रिएटिव्हिटी आणि उत्साह लक्षणीय असेल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळू शकतात. त्या करिअरसाठी उपयुक्त ठरतील. एखाद्या प्रकल्पावर काम करत असलात, तर त्यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबीयांसह वेळ व्यतीत केल्याने मनावरचा ताण हलका होईल. मित्रांसह काही आनंददायी उपक्रमांचं आयोजन करा. यामुळे मन आनंदी राहील. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. मनःशांती टिकवण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासनं करा. प्रेरणादायक आणि प्रगतिशील दिवस आहे. स्वतःच्या कल्पनांवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा.

जेवायला बसताना या दिशेला तोंड करू नये, विविध मार्गांनी येतात संकटे

मकर (Capricorn) : महिन्यात अनेक सकारात्मक संधी मिळतील. मेहनतीचं आणि निष्ठेचं फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या प्रयत्नांचं कौतुक करतील. तुम्हाला बढती मिळण्याची किंवा नवीन जबाबदाऱ्या घेण्याची वेळ येऊ शकते. व्यावसायिक बाबतीत नवीन प्रकल्पांमध्ये विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका. तुमचं मत महत्त्वाचं आहे आणि त्याची योग्य दखल घेतली जाईल. कुटुंबीयांशी नातं अधिक दृढ होईल. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत कराल. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे चांगलं वाटेल. नवीन संधींचं स्वागत करा. कष्टांची फळं मिळतील.

कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र परिणाम दिसतील. क्रिएटिव्ही समोर येईल. तुम्हाला तुमच्या कल्पना व्यक्त करण्याची प्रेरणा मिळेल. मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत केल्यास मनःशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना प्रोत्साहन मिळू शकतं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल; मात्र दुसऱ्यांच्या गोष्टींकडे अति लक्ष दिल्यामुळे तुमचा गोंधळ उडू शकतो. आतल्या आवाजावर विश्वास ठेवा. थोडा वेळ योगासनं किंवा ध्यानधारणा करण्याने मानसिक आरोग्य सुधारेल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुम्ही नवीन आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकाल.

या जन्मतारखा असलेल्या मुली फार इमोशनल होतात; जोडीदाराशी जुळवून घेण्यात नंबर 1

मीन (Pisces) : काळ सकारात्मक आहे. तुमची संवेदनशीलता इतरांशी नातेसंबंध प्रस्थापित करण्यात तुम्हाला मदत करील. तुमचे विचार आणि भावना शेअर करण्याची प्रेरणा मिळेल. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसह विशेष क्षण व्यतीत करण्याची संधी मिळेल. त्यामुळे मनःशांती वाढेल. कार्यक्षेत्रात तुमची क्रिएटिव्हिटी नवीन यश देऊ शकते. तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करत असलात, तर संयम आणि कष्ट यांमुळे चांगले परिणाम मिळू शकतात. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. थोडी योगासनं किंवा ध्यानधारणा यांमुळे मानसिक शांती सुधारेल. सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घ्या आणि सामाजिक जीवन मजेदार बनवा. नवीन मैत्री करण्यासाठी चांगला काळ आहे. हिवाळ्याचा आनंद घ्या आणि सकारात्मक ऊर्जा राखा. ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक पद्धतीने पुढे जा. नव्या शक्यता आजमावा.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Monthly Horoscope: नव्या वाटा शोधाव्या लागणार! फेब्रुवारी महिना या राशींना अनलकी, धनहानीचे संकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल