Numerology: या जन्मतारखा असलेल्या मुली फार इमोशनल होतात; जोडीदाराशी जुळवून घेण्यात नंबर 1
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असतात. यांचं काम शिस्तबद्ध असतं. या मुली उत्साही असतात. तसंच कामाशी कमिटेड म्हणजेच कामाशी कटिबद्ध असतात. या मुलींकडे उत्तम संवादकौशल्य असतं.
मुंबई : मूलांक 2 असलेल्या मुली अतिशय भावनाप्रधान असतात. तसंच, या मुली पूर्णतः लवचीकही असतात. या मुली खूपच निष्पाप/निरागस वाटतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेल्या मुली स्वयंशिस्त पाळणाऱ्या असतात. वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असतात. यांचं काम शिस्तबद्ध असतं. या मुली उत्साही असतात. तसंच कामाशी कमिटेड म्हणजेच कामाशी कटिबद्ध असतात. या मुलींकडे उत्तम संवादकौशल्य असतं.
या व्यक्तींना अंतःप्रेरणेची अनेकदा साथ लाभते. या व्यक्ती दयाळू असतात आणि या व्यक्ती युनिव्हर्सल पार्टनर्स म्हणून ओळखल्या जातात. कारण त्यांचं कोणाशीही पटतं. या व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व आध्यात्मिकही असतं. छोट्या मोठ्या गोष्टींवरून भावनिक होतात.
या गोष्टींमध्ये काळजी घेण्याची गरज : या व्यक्ती आत्मविश्वास गमावू शकतात. या व्यक्तींच्या निर्णयांवर भावनांचा परिणाम होतो. या व्यक्तींचे मूड्स बदलत राहतात आणि त्यात चढ-उतार होत राहतात.
advertisement
या व्यक्ती अत्यंत संवेदनशील असतात. दोन जन्मांक असलेल्या व्यक्ती जजमेंटल असतात. त्या व्यक्तींना नातेसंबंधांत संघर्षांना तोंड द्यावं लागू शकतं. कधी-कधी व्यक्ती अती काळजी घेतात आणि चोखंदळ वागतात.
2 हा अंक चंद्राचं प्रतिनिधित्व करतो. सामाजित प्रतिष्ठा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व यांच्याशी नशिबाची सांगड घालण्याचं काम चंद्र करतो. जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य आपणास लागू होतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 31, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: या जन्मतारखा असलेल्या मुली फार इमोशनल होतात; जोडीदाराशी जुळवून घेण्यात नंबर 1