२०२६ मध्ये शुभ गजकेसरी राजयोगाचा संयोग
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू (बृहस्पति) आणि चंद्र यांच्या युतीने गजकेसरी राजयोग तयार होतो. ही युती जिथे घडते, त्या राशीच्या व्यक्तींना संपत्ती, सन्मान, यश आणि आनंद प्राप्त होतो. २०२६ च्या सुरुवातीला गुरू मिथुन राशीत वक्री अवस्थेत असेल. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:२५ वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल आणि ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:४२ पर्यंत तेथे राहील. या कालावधीत गुरू आणि चंद्राची युती होऊन गजकेसरी राजयोगाची निर्मिती होईल. हा योग तयार होताच, काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होईल.
advertisement
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२६ चे वर्ष सोन्याचे पर्वणीसारखे ठरणार आहे. या काळात नोकरीत बढती, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. व्यवसायिकांना नव्या संधी मिळतील आणि व्यापारात प्रगती होईल. घरात शुभकार्याची शक्यता आहे, तसेच अविवाहित व्यक्तींसाठी विवाहयोग तयार होईल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभल्याने बचत आणि उत्पन्न दोन्ही वाढतील.
मिथुन राशी
गजकेसरी राजयोगाचा सर्वाधिक परिणाम मिथुन राशीवर होणार आहे, कारण हा योग याच राशीत तयार होत आहे. गुरू आणि चंद्राची युती या राशीच्या व्यक्तींना मान-सन्मान, यश आणि मोठे आर्थिक लाभ देईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. बोलण्यात आकर्षकता येईल, ज्यामुळे नवीन संबंध आणि संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग हा भाग्यवृद्धीचा काळ घेऊन येणार आहे. करिअरमध्ये मोठे बदल आणि नवीन दिशा मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती सुधारेल, मालमत्तेचे व्यवहार अनुकूल राहतील. तसेच, आरोग्य सुधारेल आणि मानसिक समाधान वाढेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभल्याने या काळात प्रगतीचा मार्ग खुला होईल.
