गणेश जयंती - पंचांगानुसार, यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी 22 जानेवारी, गुरुवार रोजी पहाटे 2 वाजून 47 मिनिटांनी सुरू होईल. या तिथीची समाप्ती 23 जानेवारी, शुक्रवार रोजी पहाटे 2 वाजून 28 मिनिटांनी होईल. उदयतिथीच्या आधारावर गणेश जयंती 22 जानेवारी, गुरुवार रोजी साजरी केली जाईल.
गणेश जयंती मुहूर्त - यावर्षी गणेश जयंतीला पूजेचा शुभ मुहूर्त 2 तास 8 मिनिटांचा आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची पूजा सकाळी 11 वाजून 29 मिनिटांपासून सुरू करू शकता. मुहूर्ताची समाप्ती दुपारी 1 वाजून 37 मिनिटांनी होईल.
advertisement
वर्षातील पहिली बॅडन्यूज..! दिनांक 7 जानेवारीपासून 3 राशींचा मजबूत किल्ला ढासळणार
रवि योगात गणेश जयंती - गणेश जयंतीच्या मुहूर्तावर रवि योग सकाळी 07 वाजून 14 मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी 02 वाजून 27 मिनिटांपर्यंत राहील. हा एक शुभ योग असून यामध्ये सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. गणेश जयंतीची पूजा याच रवि योगात संपन्न होईल.
रवि योगाव्यतिरिक्त त्या दिवशी वरीयन योग पहाटेपासून संध्याकाळी 05 वाजून 38 मिनिटांपर्यंत आहे. त्यानंतर परिघ योग सुरू होईल. नक्षत्र पाहता, शतभिषा नक्षत्र पहाटेपासून दुपारी 02 वाजून 27 मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर पूर्व भाद्रपद नक्षत्र सुरू होईल.
गणेश जयंतीवर भद्रकाळ - या दिवशी दुपारी भद्रा लागत असल्यामुळे पूजेचे नियोजन शुभ मुहूर्तात करणे फलदायी ठरेल. भद्रा काळात नवीन कार्याची सुरुवात किंवा शुभ कार्ये टाळावीत.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
