जमुई : व्हॅलेंटाइन वीक आज म्हणजे 7 फेब्रवारीपासून सुरु होत आहे. तो 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालेल. व्हॅलेंटाईन वीकला लव्ह वीक असेही म्हणतात. या काळात लोक आपले प्रेम व्यक्त करतात. चॉकलेट्स आणि तसेच इतर भेटवस्तू देतात. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमीयुगुल एकमेकांना टेडी बियर गिफ्ट करतात.
टेडी बियर प्रेमाचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये आपल्या प्रियकर प्रेयसीसाठी एकमेकांचे प्रेम असते, असे मानले जाते. त्यामुळे अनेक जण आपला प्रियकर किंवा आपल्या प्रेयसीला त्यांच्या आवडीचे टेडी बियर भेट देतात. मात्र, यावेळी काय खबरदारी घ्यावी, हे महत्त्वाचे आहे. ज्योतिषाचार्य पंडित शत्रुघ्न झा यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
त्यांनी सांगितले की, लोकांनी एकमेकांना टेडी बियर गिफ्ट करताना रंगांची विशेष काळजी घ्यावी. लोकांनी त्यांच्या राशीनुसार टेडी बियर गिफ्ट करावे. वेगवेगळ्या राशीच्या लोकांना वेगवेगळ्या रंगांच्या वस्तू भेट देणे योग्य नाही. त्यांच्या राशीपेक्षा वेगळा रंग त्यांच्यासाठी चांगला नाही. त्याचा वाईट प्रभाव हा प्रेमसंबंधावर पडू शकतो. त्यामुळे कोणत्या राशीनुसार कोणत्या रंगाचे टेडी बियर गिफ्ट करावे, हे जाणून घेऊयात.
राशीनुसार कोणता रंग चांगला राहील -
मेष - लाल, पांढरा, गुलाबी, नारंगी, वर्जित: काळा
वृषभ - गुलाबी, मलई, पांढरा किंवा तपकिरी रंग, वर्जित : लाल
मिथुन - हिरवा, काळा, पांढरा, लाल आणि गुलाबी
कर्क – हरा और पीला
सिंह - सफेद, गोल्डन, पीला
कन्या - पीच, हलका निळा, हलका गुलाबी रंग
तूळ - निळा, पिवळा
वृश्चिक - जांभळा, तपकिरी, हिरवा आणि लाल
धनु - पांढरा, लाल, निळा, नारिंगी
मकर - तपकिरी, खाकी पांढरा, वर्जित : लाल
कुंभ - जांभळा
मीन – पिवळा, पांढरा, लाल
सूचना - ही बातमी ज्योतिषांशी संवाद साधल्यावर लिहिली गेली आहे. याबाबत न्यूज18 लोकल कोणताही दावा करत नाही.
