आज येथे आम्ही तुम्हाला अशा काही राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर कुबेर देवाची कृपा नेहमी राहते. कुबेराच्या कृपेनं या लोकांना सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात आणि हे लोक अतिशय धनवान होतात. या राशींविषयी जाणून घेऊया...
धनु रास - धनु राशीवर कुबेरदेव मेहेरबान असतात. कुबेरदेव या राशीच्या लोकांना खूप धनवान बनवतात. त्याचबरोबर हे लोक खूप मेहनती आणि प्रामाणिक देखील असतात. कुबेराच्या कृपेनं त्यांना सर्व भौतिक सुखे मिळतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर हे लोक सहज मात करतात. या राशीचे लोक ज्या कामाला हात घालतात, त्यात त्यांना यश नक्की मिळतं.
advertisement
जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अॅटिट्यूड दाखवतात
वृषभ रास - या राशीवरही कुबेराचा विशेष आशीर्वाद असतो. या लोकांना जीवनात सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात. तसेच, हे लोक पैशांची बचत करण्यात माहीर असतात. हे लोक आलिशान जीवन (Luxury Life) जगतात. समाजात त्यांचे खूप नाव असते. कुटुंबातील प्रत्येकाचे ते लाडके असतात. त्यांना पद-प्रतिष्ठा प्राप्त होते. हे लोक दूरदृष्टी असलेले आणि मेहनती असतात.
तूळ रास - तूळ रास देखील भाग्यवान राशींपैकी एक मानली जाते, कारण या राशीच्या लोकांवरही कुबेराची विशेष कृपा असते. या राशीच्या लोकांना धन-दौलताची कमतरता राहत नाही. तसेच, कुबेराच्या कृपंने हे लोक जीवनात खूप मान-सन्मान मिळवतात. भगवान कुबेरांच्या आशीर्वादानं ते पैसे कमावण्यात यशस्वी होतात. प्रत्येक लहान संधीतून पैसे कमविण्याची क्षमता या राशीच्या लोकांमध्ये असते.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)