लाल कपड्यात ठेवा तुळस - आर्थिक चणचण फार काळापासून होत असेल किंवा शिल्लक काही राहत नसेल, तर तुळशीचा एक उपाय नक्की करा. यासाठी तुळशीची काही सुकलेली पानं घेऊन ती लाल कपड्यामध्ये बांधा आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. हा उपाय धन-समृद्धीची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि घरात पैशांचा ओघ वाढवतो. हा उपाय केल्यानं आर्थिक समस्या हळूहळू संपू लागतात आणि घरात समृद्धीचा वास होतो.
advertisement
तुळशीला हळद आणि जल अर्पण करा - सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी (जल) अर्पण करणे खूप शुभ मानले जाते, पण जर तुम्ही त्यात हळद मिसळली तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. शास्त्रांनुसार, हळद आणि पाणी एकत्र करून तुळशी मातेला अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दरम्यान, तुळशी मातेसमोर आपल्या इच्छा खऱ्या मनाने व्यक्त करा. हा उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो आणि प्रत्येक अडकलेले काम हळूहळू पूर्ण होऊ लागते, असे मानले जाते.
तुळशीजवळ रोज दिवा लावा - प्रत्येक संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तूप किंवा तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि दृष्ट लागत नाही. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात यश हवे असेल, तर तुळशीजवळ दिवा लावून भगवान विष्णूंचे नाव घेणं खूप प्रभावी उपाय आहे. हा उपाय केवळ आर्थिकदृष्ट्या बळकट करत नाही, तर घरातील वातावरणही शांत आणि सुखी बनवतो.
प्यार में...! A अक्षरानं नाव सुरू होणारे असेच असतात; प्रेमात यांच्यासोबत नेहमी
शास्त्रांनुसार, तुळशी पूजेदरम्यान भगवान विष्णूंना चंदनाचा टिळा लावणं आणि माता लक्ष्मीला लाल चुनरी अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुळशीची पाने समाविष्ट करा. हा उपाय पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यास, वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि सौहार्द (प्रेमळ वातावरण) आणण्यास मदत करतो. त्यामुळे नात्यात गोडवा येतो आणि जीवनात शांती टिकून राहते.
तुळशीच्या रोपाखाली नाणे - तुमच्या घरात सतत पैशांची अडचण येत असेल, तर तुळशीच्या रोपाखाली एक चांदीचे किंवा तांब्याचे नाणे (सिक्का) ठेवा. हे नाणे स्वच्छ आणि पवित्र असावे याची काळजी घ्या. या उपायामुळे पैशांचे अडथळे दूर होतात आणि घरात आर्थिक स्थिरता येते.
तुळशीच्या सुकलेल्या पानांचा वापर - तुळशीची सुकलेली पाने कधीही फेकून देऊ नयेत. ती लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून घरातील देवघरात ठेवावीत. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख-शांती टिकून राहते. तुळशीची सुकलेली पाने पाण्यात टाकून स्नान केल्यास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
