आश्लेषा, विशाखा, कृत्तिका, चित्रा, मघा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रांवर जन्म झालेली माणसं राक्षस गणाची असतात. पण, तरीही या प्रत्येक नक्षत्राचे गुण हे वेगळे आहेत, क्षेत्र वेगळी आहेत, अभिव्यक्ती वेगळी आहे. म्हणजे थोडक्यात प्रकृतीच वेगळी आहे.
आपल्या समाजात अनेक चुकीच्या रूढी, परंपरा असतात. काही मूठभर लोक समाजावर अन्याय करत असतात. या सर्व गोष्टींच्या विरोधात कोणीतरी काहीतरी करावे, असे सगळ्यांनाच वाटते. पण, पाय रोवून अन्यायाच्या विरोधात कितीजण पुढे उभे ठाकतात? तसं उभा राहणारी, क्रांतीकारक राक्षस गणाचे लोक असतात.
advertisement
आठवड्यात बुधादित्य योग! मंगळ-शनीची युती या राशींना शुभ, साप्ताहिक राशीभविष्य
मऊ आणि अत्यंत भावनिक अशा तुकाराम महाराज किंवा मीराबाई यांच्या सारखे व्यक्तिमत्व कधी सैन्याचे सेनापती होऊ शकले असते का? त्यांचा पिंडच या कामासाठी योग्य नव्हता तर त्यांची योजना ही वेगळ्या कर्मासाठी होती. जर लष्कराचा सेनापती व्हायचे असेल तर मूळ नक्षत्राचे कणखर व्यक्तीच पाहिजे. कठोर निर्णय घेण्याची क्षमता जी राक्षस गणात असते ती देवगणात किंवा मनुष्य गणात नाही. त्यामुळे राक्षस गणाची माणसे वाईट असतात असे काहीही नाही. जग चालवायला सगळेच हवेत.
माघी अमावस्या 5 शुभ संयोगात! या गोष्टींचे दान केल्यानं होईल पितृदोष शांती
लग्न जुळवण्यासाठी फक्त गुणमेलन अर्थात किती गुण जुळले हे बघणे किंवा फक्त मंगळ बघणे म्हणजे नखं बघून संपूर्ण माणसाविषयी बोलण्यासारखे आहे कारण तो एक स्वतंत्र आणि फार मोठा विषय आहे. 36 गुण जुळले याचा अर्थ संसार सुखाचा होईल असे नाही किंवा 1, 4 , 7 , 8 आणि 12 व्या घरात मंगळ हा ग्रह आहे, म्हणजे काहीतरी अशुभ होणार असेही नाही. घरात पेट्रोलचा साठा आपण ठेवत नाही कारण आग लागण्याची शक्यता असते. पण आग लागण्यासाठी ठिणगीसुद्धा असावी लागते. ती ठिणगी आहे का हे शोधणे हे खऱ्या ज्योतिषाचे कौशल्य आहे. जर ती ठिणगी नसेल तर आग लागत नाही हे साधे तत्व लक्षात घ्यावे.