Weekly Rashi Bhavishya In Marathi: आठवड्यात बुधादित्य योग! मंगळ-शनीची युती या राशींना शुभ, साप्ताहिक राशीभविष्य

Last Updated:
Saptahik Rashibhavishy In Marathi: येणारा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 11 मार्च ते 17 मार्च 2024 या आठवड्यासाठीचं राशिभविष्य
1/12
मेष (Aries) : सप्ताह शुभ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच तुमची स्वप्नं पूर्ण होतील. कष्टाचं फळ मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल आणि मन प्रसन्न राहील. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी सप्ताहाची सुरुवात शुभ असेल. या काळात त्यांच्या जीवनात एखादी व्यक्ती येऊ शकते किंवा त्यांचा विवाह निश्चित होऊ शकतो. शासन आणि प्रशासनाकडे रखडलेली कामं एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मार्गी लागतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी सप्ताहाच्या शेवटचा कालावधी शुभ आहे. या कालावधीत व्यवसायात नफा मिळेल. तसंच व्यवसाय विस्ताराच्या दिशेने वाटचाल कराल. नोकरदार महिलांनी विशेष कामगिरी केल्याने कुटुंबात तसंच ऑफिसमध्ये त्यांचा सन्मान वाढेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. नात्यात परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Purple
Lucky Number : 10
मेष (Aries) : सप्ताह शुभ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच तुमची स्वप्नं पूर्ण होतील. कष्टाचं फळ मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल आणि मन प्रसन्न राहील. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी सप्ताहाची सुरुवात शुभ असेल. या काळात त्यांच्या जीवनात एखादी व्यक्ती येऊ शकते किंवा त्यांचा विवाह निश्चित होऊ शकतो. शासन आणि प्रशासनाकडे रखडलेली कामं एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मार्गी लागतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी सप्ताहाच्या शेवटचा कालावधी शुभ आहे. या कालावधीत व्यवसायात नफा मिळेल. तसंच व्यवसाय विस्ताराच्या दिशेने वाटचाल कराल. नोकरदार महिलांनी विशेष कामगिरी केल्याने कुटुंबात तसंच ऑफिसमध्ये त्यांचा सन्मान वाढेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. नात्यात परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Purple Lucky Number : 10
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : सप्ताह मानसिकदृष्ट्या संमिश्र असेल. कधी आनंद तर कधी दुःख वाटेल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरातल्या समस्यांमुळे चिंतेत राहाल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद वाढू शकतात; पण हे वाद न्यायालयात न जाऊ देता परस्पर संवादातून सोडवा. व्यावसायिकांनी जोखमीची गुंतवणूक टाळावी. सप्ताहाच्या मध्यात विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. त्यांनी कठोर परिश्रम केले तरच त्यांना यश मिळेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात नोकरदार व्यक्तींना ऑफिसमधल्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. या कालावधीत ते तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. जोपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्याबाबत कोणाशीही चर्चा करू नका. प्रेमजीवन विचारपूर्वक वाढवा आणि कोणत्याही प्रकारची घाई करणं टाळा. वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी कामाच्या व्यापातून थोडा वेळ कुटुंबासाठी काढा.Lucky Color : White
Lucky Number : 4
वृषभ (Taurus) : सप्ताह मानसिकदृष्ट्या संमिश्र असेल. कधी आनंद तर कधी दुःख वाटेल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरातल्या समस्यांमुळे चिंतेत राहाल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद वाढू शकतात; पण हे वाद न्यायालयात न जाऊ देता परस्पर संवादातून सोडवा. व्यावसायिकांनी जोखमीची गुंतवणूक टाळावी. सप्ताहाच्या मध्यात विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. त्यांनी कठोर परिश्रम केले तरच त्यांना यश मिळेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात नोकरदार व्यक्तींना ऑफिसमधल्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. या कालावधीत ते तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. जोपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्याबाबत कोणाशीही चर्चा करू नका. प्रेमजीवन विचारपूर्वक वाढवा आणि कोणत्याही प्रकारची घाई करणं टाळा. वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी कामाच्या व्यापातून थोडा वेळ कुटुंबासाठी काढा.Lucky Color : White Lucky Number : 4
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : जीवनात अचानक आलेलं संकट संधीत बदलू शकतं. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये अचानक एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला जादा वेळ देऊन कठोर परिश्रम करावे लागतील. हे परिश्रम वाया न जाता फलदायी ठरतील. यामुळे करिअरला चांगली गती मिळेल. ज्या व्यक्ती उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा परदेशात शिक्षण घेत आहेत, त्यांना सप्ताहाच्या उत्तरार्धात या संदर्भात चांगली बातमी मिळेल. हा कालावधी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नोकरदार व्यक्तींनी त्यांचं काम इतरांवर सोपवू नये. जोडीदारासोबतचं नातं काही कारणामुळे बिघडलं असेल तर मित्रांच्या मदतीनं गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. हंगामी आजारांपासून दूर राहिलात, तर आरोग्यविषयक समस्या जाणवणार नाहीत.Lucky Color : Brown
Lucky Number : 15
मिथुन (Gemini) : जीवनात अचानक आलेलं संकट संधीत बदलू शकतं. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये अचानक एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला जादा वेळ देऊन कठोर परिश्रम करावे लागतील. हे परिश्रम वाया न जाता फलदायी ठरतील. यामुळे करिअरला चांगली गती मिळेल. ज्या व्यक्ती उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा परदेशात शिक्षण घेत आहेत, त्यांना सप्ताहाच्या उत्तरार्धात या संदर्भात चांगली बातमी मिळेल. हा कालावधी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नोकरदार व्यक्तींनी त्यांचं काम इतरांवर सोपवू नये. जोडीदारासोबतचं नातं काही कारणामुळे बिघडलं असेल तर मित्रांच्या मदतीनं गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. हंगामी आजारांपासून दूर राहिलात, तर आरोग्यविषयक समस्या जाणवणार नाहीत.Lucky Color : Brown Lucky Number : 15
advertisement
4/12
कर्क (Cancer) : सप्ताहात नशिबाची साथ कमी प्रमाणात मिळेल. वैयक्तिक जीवनातले अडथळे चिंता वाढवतील. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबातल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. घराच्या दुरुस्तीवर खर्च करावा लागेल. त्यामुळे बजेट कोलमडू शकतं; मात्र खर्च वाढला तरी दुसरीकडे उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोतही निर्माण होतील. किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य सामान्य राहील. एखादं मोठं पद किंवा जबाबदारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतील तर त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करा. सप्ताहाच्या शेवटी अचानक प्रवास करावा लागेल. हा प्रवास सुखकर होईल. यातून नवीन ओळखी होतील आणि संपर्क वाढेल. किरकोळ मतभेद असले, तरी प्रेमसंबंध सामान्य राहतील. जीवनात चढ-उतार असले तरी जोडीदाराशी नातं संतुलित राहील.Lucky Color : Golden
Lucky Number : 6
कर्क (Cancer) : सप्ताहात नशिबाची साथ कमी प्रमाणात मिळेल. वैयक्तिक जीवनातले अडथळे चिंता वाढवतील. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबातल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. घराच्या दुरुस्तीवर खर्च करावा लागेल. त्यामुळे बजेट कोलमडू शकतं; मात्र खर्च वाढला तरी दुसरीकडे उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोतही निर्माण होतील. किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य सामान्य राहील. एखादं मोठं पद किंवा जबाबदारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतील तर त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करा. सप्ताहाच्या शेवटी अचानक प्रवास करावा लागेल. हा प्रवास सुखकर होईल. यातून नवीन ओळखी होतील आणि संपर्क वाढेल. किरकोळ मतभेद असले, तरी प्रेमसंबंध सामान्य राहतील. जीवनात चढ-उतार असले तरी जोडीदाराशी नातं संतुलित राहील.Lucky Color : Golden Lucky Number : 6
advertisement
5/12
सिंह (Leo) : आठवडा अनुकूल असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला एखादी प्रभावशाली व्यक्ती भेटेल आणि तिच्यामुळे भविष्यातल्या फायदेशीर योजनांशी जोडले जाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि कनिष्ठ सहकारी पूर्ण सहकार्य करतील. ज्या व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदल करण्याच्या विचारात आहेत, त्यांना अपेक्षित संधी मिळू शकते. तुम्ही जे काम करण्याचा प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. सप्ताहाचा उत्तरार्ध व्यावसायिकांसाठी लाभदायक असेल. या कालावधीत मोठा सौदा केला तर भविष्यात मोठा नफा मिळेल. राजकीय व्यक्तींचा समाजात प्रभाव वाढेल. प्रेमसंबंधांतले गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. जोडीदाराकडून तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते.Lucky Color : Maroon
Lucky Number : 1
सिंह (Leo) : आठवडा अनुकूल असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला एखादी प्रभावशाली व्यक्ती भेटेल आणि तिच्यामुळे भविष्यातल्या फायदेशीर योजनांशी जोडले जाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि कनिष्ठ सहकारी पूर्ण सहकार्य करतील. ज्या व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदल करण्याच्या विचारात आहेत, त्यांना अपेक्षित संधी मिळू शकते. तुम्ही जे काम करण्याचा प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. सप्ताहाचा उत्तरार्ध व्यावसायिकांसाठी लाभदायक असेल. या कालावधीत मोठा सौदा केला तर भविष्यात मोठा नफा मिळेल. राजकीय व्यक्तींचा समाजात प्रभाव वाढेल. प्रेमसंबंधांतले गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. जोडीदाराकडून तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते.Lucky Color : Maroon Lucky Number : 1
advertisement
6/12
कन्या (Virgo) : सप्ताह संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. व्यावसायिकांना सप्ताह अपेक्षेपेक्षा कमी लाभदायक असेल. या कालावधीत गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा नफा मिळेल; पण जोखमीची गुंतवणूक टाळा. व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदाराला विश्वासात घेऊन पुढे जा. सप्ताहाच्या उत्तरार्धात परदेशाशी संबंधित व्यावसायिकांना चांगली बातमी समजेल. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत सप्ताह शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Violet
Lucky Number : 11
कन्या (Virgo) : सप्ताह संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. व्यावसायिकांना सप्ताह अपेक्षेपेक्षा कमी लाभदायक असेल. या कालावधीत गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा नफा मिळेल; पण जोखमीची गुंतवणूक टाळा. व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदाराला विश्वासात घेऊन पुढे जा. सप्ताहाच्या उत्तरार्धात परदेशाशी संबंधित व्यावसायिकांना चांगली बातमी समजेल. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत सप्ताह शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Violet Lucky Number : 11
advertisement
7/12
तूळ (Libra) : उत्साहाच्या भरात संवेदनाहीन होऊ नका. बोलण्या-वागण्यावर नियंत्रण ठेवा. काम उद्यावर ढकलणं टाळा. अन्यथा हातातून यश निसटून जाईल. ऑफिसमध्ये कोणाशी मतभेद असतील तर विनम्रपणे विरोध व्यक्त करा. अन्यथा तुमचं बरोबर असताना वागणं चुकीचं सिद्ध होऊ शकतं. सप्ताहाच्या मध्यात करिअरसाठी प्रवास करावा लागू शकतो. प्रवास सुखकर आणि फलदायी ठरेल. जमीन, घर खरेदी-विक्री किंवा वाहन खरेदीचा विचार असेल सप्ताहाच्या उत्तरार्धात तुमची इच्छा पूर्ण होईल. नोकरदार महिलांसाठी हा कालावधी यशदायी ठरेल. घर आणि घराबाहेर त्यांचा मान-सन्मान वाढेल. अविवाहित व्यक्तींच्या जीवनात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते. पूर्वीपासून प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींचे बंध अधिक चांगले जुळतील. किरकोळ मतभेद वगळता वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Silver
Lucky Number : 3
तूळ (Libra) : उत्साहाच्या भरात संवेदनाहीन होऊ नका. बोलण्या-वागण्यावर नियंत्रण ठेवा. काम उद्यावर ढकलणं टाळा. अन्यथा हातातून यश निसटून जाईल. ऑफिसमध्ये कोणाशी मतभेद असतील तर विनम्रपणे विरोध व्यक्त करा. अन्यथा तुमचं बरोबर असताना वागणं चुकीचं सिद्ध होऊ शकतं. सप्ताहाच्या मध्यात करिअरसाठी प्रवास करावा लागू शकतो. प्रवास सुखकर आणि फलदायी ठरेल. जमीन, घर खरेदी-विक्री किंवा वाहन खरेदीचा विचार असेल सप्ताहाच्या उत्तरार्धात तुमची इच्छा पूर्ण होईल. नोकरदार महिलांसाठी हा कालावधी यशदायी ठरेल. घर आणि घराबाहेर त्यांचा मान-सन्मान वाढेल. अविवाहित व्यक्तींच्या जीवनात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते. पूर्वीपासून प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींचे बंध अधिक चांगले जुळतील. किरकोळ मतभेद वगळता वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Silver Lucky Number : 3
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : सप्ताह मध्यम फलदायी आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. ही कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. ज्या व्यक्ती तुमच्या कामात अडथळा निर्माण करू शकतात, त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. व्यावसायिकांना कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल. या कालावधीत जास्त नफा मिळवण्याच्या प्रयत्नात मोठं नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावं. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी भागीदारावर आंधळेपणानं विश्वास ठेवू नये. सप्ताहाच्या मध्यात कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्याचं आरोग्य हा चिंतेचा विषय बनेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात काही अनपेक्षित घटनांमुळे तुमचे बजेट कोलमडेल. विविध स्रोतांमधून पैसा आला तर खर्च जास्त होईल. सप्ताहाच्या शेवटी मुलांशी संबंधित मोठी चिंता दूर झाल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने सप्ताह अनुकूल नाही. त्यामुळे कोणतंही पाऊल विचारपूर्वक उचला. वैवाहिक जीवनात सुख मिळवण्यासाठी व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढा.Lucky Color : Red
Lucky Number : 9
वृश्चिक (Scorpio) : सप्ताह मध्यम फलदायी आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. ही कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. ज्या व्यक्ती तुमच्या कामात अडथळा निर्माण करू शकतात, त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. व्यावसायिकांना कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल. या कालावधीत जास्त नफा मिळवण्याच्या प्रयत्नात मोठं नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावं. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी भागीदारावर आंधळेपणानं विश्वास ठेवू नये. सप्ताहाच्या मध्यात कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्याचं आरोग्य हा चिंतेचा विषय बनेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात काही अनपेक्षित घटनांमुळे तुमचे बजेट कोलमडेल. विविध स्रोतांमधून पैसा आला तर खर्च जास्त होईल. सप्ताहाच्या शेवटी मुलांशी संबंधित मोठी चिंता दूर झाल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने सप्ताह अनुकूल नाही. त्यामुळे कोणतंही पाऊल विचारपूर्वक उचला. वैवाहिक जीवनात सुख मिळवण्यासाठी व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढा.Lucky Color : Red Lucky Number : 9
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : किरकोळ समस्या वगळता सप्ताह शुभ असेल. यश मिळवण्यासाठी तुम्हाला वेळ आणि पैशांचं योग्य नियोजन करावं लागेल. सामाजिक कार्याशी संबंधित व्यक्तींना काही कामासाठी सन्मान मिळेल. तुमचं मन धार्मिक कार्यात मग्न राहील. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. काही दिवसांपासून आजारी असलात, तर या सप्ताहात तुमचं आरोग्य सुधारेल. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्यादेखील दूर होतील. शासनाशी संबंधित प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीनं एखादी मोठी समस्या सुटेल. व्यवसाय विस्ताराचा विचार करत असलेल्या व्यक्तींसाठी सप्ताह अनुकूल आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल. प्रेमसंबंधात उत्कटता आणि परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Blue
Lucky Number : 12
धनू (Sagittarius) : किरकोळ समस्या वगळता सप्ताह शुभ असेल. यश मिळवण्यासाठी तुम्हाला वेळ आणि पैशांचं योग्य नियोजन करावं लागेल. सामाजिक कार्याशी संबंधित व्यक्तींना काही कामासाठी सन्मान मिळेल. तुमचं मन धार्मिक कार्यात मग्न राहील. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. काही दिवसांपासून आजारी असलात, तर या सप्ताहात तुमचं आरोग्य सुधारेल. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्यादेखील दूर होतील. शासनाशी संबंधित प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीनं एखादी मोठी समस्या सुटेल. व्यवसाय विस्ताराचा विचार करत असलेल्या व्यक्तींसाठी सप्ताह अनुकूल आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल. प्रेमसंबंधात उत्कटता आणि परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Blue Lucky Number : 12
advertisement
10/12
मकर (Capricorn) : सप्ताह अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी समजेल. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्या व्यक्ती परदेशात शिक्षण किंवा व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्या मार्गातले अडथळे दूर होतील. न्यायालयात एखादं प्रकरण सुरू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. कौटुंबिक समस्यांबाबत तुम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरेल. नोकरदार व्यक्तींसाठी कालावधी अनुकूल आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. बढती किंवा बदलीची इच्छा पूर्ण होईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात तीर्थक्षेत्री जाण्याची शक्यता आहे. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून सप्ताह शुभ आहे. प्रेमाचा प्रस्ताव द्यायचा असेल तर तो अवश्य द्या. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य असेल.Lucky Color : Green
Lucky Number : 8
मकर (Capricorn) : सप्ताह अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी समजेल. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्या व्यक्ती परदेशात शिक्षण किंवा व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्या मार्गातले अडथळे दूर होतील. न्यायालयात एखादं प्रकरण सुरू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. कौटुंबिक समस्यांबाबत तुम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरेल. नोकरदार व्यक्तींसाठी कालावधी अनुकूल आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. बढती किंवा बदलीची इच्छा पूर्ण होईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात तीर्थक्षेत्री जाण्याची शक्यता आहे. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून सप्ताह शुभ आहे. प्रेमाचा प्रस्ताव द्यायचा असेल तर तो अवश्य द्या. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य असेल.Lucky Color : Green Lucky Number : 8
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : सप्ताह शुभ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला एखादी प्रभावशाली व्यक्ती भेटेल. त्या व्यक्तीच्या मदतीनं भविष्यात एखाद्या फायदेशीर योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते. वेतनवाढीची शक्यता आहे. कामात बदल करण्याचा विचार असेल, तर ती इच्छादेखील पूर्ण होईल. तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी सप्ताह शुभ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासून व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. सप्ताहाच्या मध्यात व्यवसायासाठी केलेले प्रवास लाभदायक ठरतील. बाजारात विश्वासार्हता वाढेल. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवल्यास नफा मिळण्याची शक्यता वाढेल; पण गुंतवणूक करण्यापूर्वी हितचिंतकाचा सल्ला घ्या. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल.Lucky Color : Grey
Lucky Number : 7
कुंभ (Aquarius) : सप्ताह शुभ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला एखादी प्रभावशाली व्यक्ती भेटेल. त्या व्यक्तीच्या मदतीनं भविष्यात एखाद्या फायदेशीर योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते. वेतनवाढीची शक्यता आहे. कामात बदल करण्याचा विचार असेल, तर ती इच्छादेखील पूर्ण होईल. तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी सप्ताह शुभ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासून व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. सप्ताहाच्या मध्यात व्यवसायासाठी केलेले प्रवास लाभदायक ठरतील. बाजारात विश्वासार्हता वाढेल. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवल्यास नफा मिळण्याची शक्यता वाढेल; पण गुंतवणूक करण्यापूर्वी हितचिंतकाचा सल्ला घ्या. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल.Lucky Color : Grey Lucky Number : 7
advertisement
12/12
मीन (Pisces) : छोट्या फायद्यासाठी मोठं नुकसान टाळा. ज्या व्यक्ती तुम्हाला कायम संकटात आणतात, त्यांच्यापासून दूर राहा. कोणाच्या प्रभावाखाली किंवा भावनेच्या भरात निर्णय घेणं टाळा. घर असो अथवा ऑफिस, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सप्ताहात अधिकारी आणि सहकाऱ्यांना नियंत्रणात ठेवता आलं तर ते फायदेशीर ठरेल. जमीन किंवा घरासंबंधी वादासाठी न्यायालयात फेऱ्या माराव्या लागतील. हे टाळण्यासाठी वादावर न्यायालयाबाहेर तोडगा काढणं फायदेशीर ठरेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात तुम्ही मित्रांसोबत सहलीला जाल. प्रवास आनंद देणारा ठरेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या घरी प्रिय सदस्य आल्याने आनंदाचं वातावरण असेल. प्रेमसंबंधात उत्कटता येईल. जोडीदाराशी चांगला समन्वय असेल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. आरोग्य सामान्य राहील.Lucky Color : Yellow
Lucky Number : 2
मीन (Pisces) : छोट्या फायद्यासाठी मोठं नुकसान टाळा. ज्या व्यक्ती तुम्हाला कायम संकटात आणतात, त्यांच्यापासून दूर राहा. कोणाच्या प्रभावाखाली किंवा भावनेच्या भरात निर्णय घेणं टाळा. घर असो अथवा ऑफिस, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सप्ताहात अधिकारी आणि सहकाऱ्यांना नियंत्रणात ठेवता आलं तर ते फायदेशीर ठरेल. जमीन किंवा घरासंबंधी वादासाठी न्यायालयात फेऱ्या माराव्या लागतील. हे टाळण्यासाठी वादावर न्यायालयाबाहेर तोडगा काढणं फायदेशीर ठरेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात तुम्ही मित्रांसोबत सहलीला जाल. प्रवास आनंद देणारा ठरेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या घरी प्रिय सदस्य आल्याने आनंदाचं वातावरण असेल. प्रेमसंबंधात उत्कटता येईल. जोडीदाराशी चांगला समन्वय असेल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. आरोग्य सामान्य राहील.Lucky Color : Yellow Lucky Number : 2
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement