दिवाळीत हत्ती दिसणं - धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या पवित्र सणादिवशी जर तुम्हाला अचानक हत्ती दिसला, तर ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमच्या जीवनातही शुभता येणार आहे. तसेच, हत्ती दिसण्याचा अर्थ आहे की तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे.
घुबड दिसणं - घुबड माता लक्ष्मीचे वाहन आहे. दिवाळीच्या दिवशी घुबड दिसणं देखील खूप शुभ मानले जातं. घुबड दिसण्याचा अर्थ लक्ष्मी तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर करेल. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल आणि कौटुंबिक जीवनातही तुम्हाला आनंद मिळेल.
advertisement
जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अॅटिट्यूड दाखवतात
गाय दिसणं- जर दिवाळीच्या दिवशी तुम्हाला रस्त्यातून जाताना गाय दिसली, तर हा शुभ संकेत आहे. आणि गाय तुमच्या घरात आली, तर ते आणखी शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला सुख-समृद्धीची प्राप्ती होईल.
चिचुंद्री दिसणं- दिवाळीच्या पवित्र सणादरम्यान चिचुंद्री दिसणं देखील शुभ मानले गेलं आहे. चिचुंद्री दिसणं हे या गोष्टीचे संकेत आहे की तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील.
स्वप्नात माता लक्ष्मी येणं - दिवाळीच्या काळात माता लक्ष्मीला स्वप्नात पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. जर माता लक्ष्मी स्वप्नात आली तर समजून घ्या, तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला मातेची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनात धनवर्षा होईल.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)