TRENDING:

Job Alert: ईएसआयसीत नोकरीची संधी; लेखी परीक्षेविना होणार भरती; 67,000 रुपये असेल पगार

Last Updated:

Job Alert: ईएसआयसीच्या या भरती प्रक्रियेमधून एकूण 18 पदं भरली जाणार आहेत. तुम्ही ईएसआयसीमध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर 7 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात ईएसआयसीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांकरिता एक उत्तम संधी आहे. ईएसआयसीने विविध विभागांमध्ये सहायक प्राध्यापक या पदासाठी भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ईएसआयसीच्या esic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
News18
News18
advertisement

ईएसआयसीच्या या भरती प्रक्रियेमधून एकूण 18 पदं भरली जाणार आहेत. तुम्ही ईएसआयसीमध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर 7 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात.

ईएसआयसीमध्ये भरली जाणार ही पदं

ईएसआयसी भरती 2024 च्या माध्यमातून विविध विभागांत सहायक प्राध्यापक हे पद भरलं जाणार आहे. यात अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फारमॅकटलॉजी या विभागात प्रत्येकी एक, जनरल मेडिसीन विभागात दोन, डर्मेटोलॉजी, सायकिअॅट्री, टीबी अँड चेस्ट विभागात प्रत्येकी एक, जनरल सर्जरी विभागात दोन, अॅनेस्थेशिया विभागात तीन, इमर्जन्सी मेडिसीन, पीएमआर आणि स्टॅटिस्टिशियन विभागात प्रत्येकी एक अशा 18 पदांचा समावेश आहे.

advertisement

ईएसआयसीत नोकरीसाठी वयोमर्यादा काय असेल?

या पदांसाठी इ्च्छुक उमेदवाराचं वय किमान 69 वर्षं असावं. वयोमर्यादेत बसणारे उमेदवार पात्र ठरतील.

ईएसआयसीसाठी आवश्यक पात्रता -

ईएसआयसीच्या या भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छितात, त्यांच्याकडे अधिकृत नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार पात्रता असावी.

चांगलं मायलेज पडेल कसं? कित्येक लोक वाहन चालवताना करतात या 5 चुका

advertisement

ईएसआयसीत अर्ज करण्यासाठी किती असेल शुल्क -

ईएसआयसी भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क आकारलं जाईल. यात एससी/एसटी/ईएसआयसी (नियमित कर्मचारी)/महिला उमेदवार/ माजी सैनिक/ पीएच उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावं लागणार नाही. याशिवाय इतर सर्व श्रेणीतल्या उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क असेल. त्यांना डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून हे शुल्क भरावं लागेल. हा ड्राफ्ट ईएसआयसी हॉस्पिटल, भिटा एसबी एसीसी-2, पेएबेल अॅट भिंटा, पाटणा, एसबीआय शाखा कोड - 01217 या नावाने काढावा लागेल.

advertisement

निवड झाल्यास किती मिळणार वेतन -

अधिकृत नोटिफिकेशननुसार, ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड होईल, त्यांना वेतन म्हणून दरमहा 67,7000 रुपये आणि इतर भत्ते दिले जातील.

4 प्रकारचं असतं पेट्रोल; तुमच्या कारसाठी कोणतं बेस्ट इथं पाहा

ईएसआयसीत अशी होणार निवड -

ईएसआयसी भरती 2024 च्या अधिकृत नोटिफिकेशनुसार उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा टीए/डीए दिला जाणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Job Alert: ईएसआयसीत नोकरीची संधी; लेखी परीक्षेविना होणार भरती; 67,000 रुपये असेल पगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल