पाटणा, 23 ऑक्टोबर : दसऱ्यानंतर शरद पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. अनेक वर्षांनंतर शरद पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण लागणार आहे. याचा प्रभाव हा देवापासून सर्वसामान्य सर्वांवररच पडणार आहे.
शरद पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रात्री चंद्रासमोर खीर ठेवून सोरस कला प्राप्त केली जाते. ते केले जाणार नाही. तसेच पौर्मिणेच्या दिवशी श्रीकृष्णाला विशेष नैवेद्य दाखवण्याचीही परंपरा आहे. हा नैवेद्य यावर्षी दाखवला जाणार नाही. चंद्रग्रहणानंतर राहु आणि केतु आपली चाल बदलणार आहेत. याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर पडणार आहे.
advertisement
भारतीय वेळेनुसार, खंडग्रास चंद्रग्रहण रात्री 1:05 वाजता सुरू होईल. मध्यरात्री 1:44 वाजता ग्रहण दिसेल. ग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ लागेल. याबाबत पाटणा येथील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉ. श्रीपति त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चंद्रग्रहणाचा परिणाम नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिल्यास बर्फवृष्टी, भूकंप आणि त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अन्नपदार्थ, खनिजे, धातू, कपडे इत्यादींच्या किमतीत चढ-उतार होऊ शकतात. तसेच पांढरे पदार्थ, द्रव इत्यादींच्या किमतीत वाढ होणार आहे.
राशींवर असा होणार परिणाम -
मेष राशी : काही अज्ञात भीतीमुळे त्रास होऊ शकतो. व्यवहारात सावधानता बाळगा. विश्वासघात होऊ शकतो. शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल.
वृषभ राशी : रागावर नियंत्रण ठेवा. नाहीतर, नुकसान होऊ शकते. नोकरी आणि शैक्षणिक कार्यात फायदा होईल. आईकडून आर्थिक लाभ होऊ शकतो.
मिथुन राशी : आरोग्याप्रती सावध हाहा. खर्चात वाढ होईल. जीवनसाथी-सोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.
कर्क राशी : नोकरीमध्ये बदलीचा योग तयार होत आहे. मन प्रसन्न राहील. उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे.
सिंह राशी : विदेशात प्रवास होण्याची शक्यता आहे. धैर्यशीलता कमी होईल. एखादा मित्र नोकरीसाठी गॉडफादर बनू शकतो.
कन्या राशी : उत्पन्नात घट आणि खर्च वाढेल. आरोग्यावर लक्ष ठेवा. विनाकारण वाद होईल.
तूळ राशी : जास्त धावपळ होण्याची शक्यता आहे. स्त्री पीडा योग असल्याने आपल्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक राशी : वेळ चांगली असेल. उत्पन्न वाढेल आणि खर्चही वाढेल. प्रगतीचा योग आहे.
धनु राशी : प्रगती होईल. मात्र, अतिउत्साही होण्यापासून वाचा. चिंता आणि भीती तुम्हाला त्रास देईल. तुमच्या मुलाच्या तब्येतीचीही काळजी घ्यावी लागेल.
मकर राशी : प्रगतीचा योग आहे. मात्र, मन अस्वस्थ राहील. आईची तब्येत बिघडू शकते. जीवनसाथीची साथ मिळेल.
कुंभ राशी : आपल्या भावना नियंत्रणात ठेवा. कार्यक्षेत्रात परिवर्तन होईल. भावांचे सहकार्य लाभेल.
मीन राशी : शिक्षणात यश मिळे. मान-सम्मान वाढेल. यशासाठी रस्ता तयार होईल. सुखद परिणामाचा योग आहे.
(ही सर्व माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज18 याबाबत कोणताही दावा करत नाही)