Success Story: नर्सरी व्यवसाय असावा तर असा, महिन्याला 1 लाख रुपये कमाई, कसा कराल तुम्हीही सुरू? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
श्रीसंत सावता नावाची नर्सरी जितेंद्र माळी यांनी सुरू केली आहे. या नर्सरी व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला एक ते दीड लाख रुपयांची कमाई होते.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या लिंक रोडवरील गोलवाडी परिसरात श्रीसंत सावता नावाची नर्सरी जितेंद्र माळी यांनी सुरू केली. ही नर्सरी हिरालाल बिंद हे गेल्या 10 वर्षांपासून चालवण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडे फळबाग, शो प्लांट, इंडोर प्लांट यासह विविध प्रकारच्या फुलांची झाडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फुलांमध्ये गुलाब, मोगरा, जास्वंदचा समावेश असतो. या नर्सरी व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला एक ते दीड लाख रुपयांची कमाई होत असल्याचे बिंद यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
श्रीसंत सावता नर्सरी सुरुवातीच्या काळात छत्रपती संभाजी नगरातील हर्सूल गावात होती. गोलवाडी परिसरात ही नर्सरी सुरू आहे. इतर व्यवसायांप्रमाणेच नर्सरी व्यवसाय देखील चांगला असून नेहमी आपण निसर्गाच्या सानिध्यात राहतो, यामुळे ऑक्सिजन मिळते. विविध प्रकारच्या झाडांची माहिती मिळते.
नर्सरी व्यवसाय करताना प्रामुख्याने इंडोर प्लांटच्या झाडांची जास्त प्रमाणात विक्री होते. आजकाल फार्मवर किंवा घराच्या बाल्कनीमध्ये हिरवीगार दिसणारी, फुलांच्या कळ्या उमलणारी झाडे लावलेली दिसतात, त्यामुळे या झाडांना प्रचंड मागणी असल्याचे देखील बिंद यांनी म्हटले आहे.
advertisement
नर्सरी व्यवसाय करायचा?
नर्सरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्वांनीच या व्यवसायाची माहिती घ्यायला हवी, ही माहिती नर्सरी चालकाकडून किंवा मोबाईल द्वारे देखील घेतली जाऊ शकते. झाडांना वेळेवर पाणी देणे, खत देणे यासह झाडांची कटिंग करणे अशा बारीक गोष्टींचा अभ्यास करून काळजी घ्यावी लागते. यामुळे जेणेकरून भविष्यात अडचण निर्माण होणार नाही.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
September 12, 2025 7:43 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story: नर्सरी व्यवसाय असावा तर असा, महिन्याला 1 लाख रुपये कमाई, कसा कराल तुम्हीही सुरू? Video