प्रेमसंबंधाचा वाईट शेवट होतो - तळहातामध्ये करंगळीच्या (कनिष्ठा बोट) अगदी खाली विवाह रेषा असते. ही रेषा प्रेम रेषा किंवा लव लाइन म्हणून ओळखली जाते. याच रेषांवरून कळते की एखाद्या व्यक्तीचे प्रेम जीवन कसे असणार आहे. लग्नानंतर आयुष्य कसे जाईल आणि जीवनात प्रेमसंबंधांची स्थिती कशी राहील. ही रेषा तिच्या रचनेतून प्रेम जीवनाबद्दल अनेक संकेत देते.
advertisement
कोणाच्या हातात प्रेम रेषा स्पष्ट दिसत नसेल किंवा तुटलेली असेल, तर ते चांगले मानले जात नाही. अशा रेषा सूचित करतात की व्यक्तीच्या प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात. प्रेम जीवनापासून ते वैवाहिक जीवनापर्यंत त्रासांचा सामना करावा लागू शकतो. तळहातावर अशा रेषा असल्यामुळे प्रेमात वारंवार फसवणूक होणे, नातेसंबंध वारंवार तुटणे आणि प्रेमाचा शेवट वाईट होण्याची शक्यता वाढते.
प्यार में...! A अक्षरानं नाव सुरू होणारे असेच असतात; प्रेमात यांच्यासोबत नेहमी
योग शुभ कसा ओळखावा - तळहातातील सूर्य रेषेशी (Sun Line) विवाह रेषेचा संयोग होत असेल, तर तो एक शुभ संकेत मानला जाऊ शकतो. अशा प्रकारची रेषा दर्शवते की व्यक्ती सुखाने वैवाहिक जीवन व्यतीत करेल. ज्यांच्या तळहातावर अशी रेषा असते, त्यांच्यासाठी प्रेमविवाह करण्याचे सर्व मार्ग खुले होतात. लग्न चांगल्या घरात आणि चांगल्या जीवनसाथीसोबत होते. जीवन शांततेत व्यतीत होते.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)