महाअष्टमीला कन्या पूजन मुहूर्त - शारदीय नवरात्राच्या महाअष्टमीची तिथी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३१ वाजता सुरू झाली आणि आज, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०६ वाजता संपेल.
महाअष्टमीच्या दिवशी कन्या पूजनाचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी ५:०१ ते ६:१३ पर्यंत असेल. दुसरा शुभ मुहूर्त सकाळी १०:४१ ते दुपारी १२:११ पर्यंत असेल. याव्यतिरिक्त, कन्या पूजनासाठी अतिशय शुभ मानला जाणारा अभिजित मुहूर्त सकाळी ११:४७ ते दुपारी १२:३५ पर्यंत असेल. आज या तीन शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही कन्या पूजन करू शकता.
advertisement
महाअष्टमीला कन्या पूजन कसे केले जाते?
महाअष्टमीच्या दिवशी कन्या पूजनासाठी किमान ९ मुली आणि १ लहान मुलाला आमंत्रित करावे. मुली आल्यावर, प्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवा, कपाळावर टिळा लावा आणि स्वच्छ आसनावर त्यांना बसवा. त्यानंतर त्यांचना आवडीचे स्वच्छ, शुद्ध आणि स्वादिष्ट जेवण खायला द्या. जेवणानंतर मुलींना तुमच्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्या आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायांना स्पर्श करा.
खडतर काळातून बाहेर! 2046 पर्यंत या राशीच्या लोकांना चिंता नाही, एकमार्गी प्रगती
महाअष्टमीला कन्या पूजनाचे नियम -
नवरात्री दरम्यान, दररोज एका मुलीची पूजा केली जाते आणि अष्टमी किंवा नवमीला नऊ मुलींची पूजा केली जाते. या दिवशी २ वर्षांच्या मुलीची (कुमारी) पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते, असे मानले जाते. ३ वर्षांच्या मुलीची त्रिमूर्ती म्हणून पूजा केली जाते. त्रिमूर्ती मुलीची पूजा केल्याने घरात धन आणि समृद्धी येते. ४ वर्षांच्या मुलीला कल्याणी मानले जाते. तिची पूजा केल्याने कुटुंबात कल्याण होते. ५ वर्षांच्या मुलीला रोहिणी म्हणतात. रोहिणीची पूजा केल्याने व्यक्तीचे आजार बरे होतात.
६ वर्षांच्या मुलीची कालिका म्हणून पूजा केली जाते. कालिका ज्ञान, विजय आणि राजयोग देते. ७ वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणतात. चंडिकेची पूजा केल्याने घरात समृद्धी येते. ८ वर्षांच्या मुलीला शांभवी म्हणतात. तिची पूजा केल्याने वादविवादात विजय मिळतो. ९ वर्षांच्या मुलीला दुर्गा म्हणतात. तिची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो. १० वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात. सुभद्रा तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
दुर्गा देवीची 108 नावं माहीत आहेत का? नवरात्रीच्या पूजेवेळी करावा जप
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)