Shardiya Navratri 2025: दुर्गा देवीची 108 नावं माहीत आहेत का? नवरात्रीच्या पूजेवेळी करावा जप
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Navratri 2025: नवरात्राच्या पवित्र प्रसंगी देवी दुर्गेच्या काही नावांचा नियमितपणे जप केल्याने कुटुंबातील कलह आणि वाद दूर होतात. घरात सतत आजार असतील किंवा कामात अडचणी येत असतील तर देवीच्या या पवित्र नावांचे स्मरण करणे फायदेशीर ठरू शकते.
मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. हा नऊ दिवसांचा उत्सव देवी दुर्गेच्या भक्ती आणि पूजेसाठी समर्पित आहे. नवरात्रीच्या काळात देवी पृथ्वीवर अवतरण करते आणि तिच्या भक्तांना सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते, असे मानले जाते. या काळात लोक उपवास करतात आणि पूर्ण विधींनी देवीची पूजा करतात. या पवित्र प्रसंगी देवी दुर्गेच्या काही नावांचा नियमितपणे जप केल्याने कुटुंबातील कलह आणि वाद दूर होतात. घरात सतत आजार असतील किंवा कामात अडचणी येत असतील तर देवीच्या या पवित्र नावांचे स्मरण करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते. या नावांना दुर्गा अष्टोत्तर शतनामावली म्हणतात.
जप कसा करावा?
नवरात्रीच्या काळात सकाळी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि देवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा लावा. नंतर पूर्ण भक्तीनं दुर्गा अष्टोत्तर शतनामावलीचा पाठ करा. नावांचे पठण मनातल्या मनात किंवा मोठ्याने करू शकता.
देवी दुर्गेची 108 नावे (Durga 108 Naam)
·सती
·साध्वी
·भवप्रीता
·भवानी
·भवमोचनी
·आर्या
·दुर्गा
·जया
·आद्या
·त्रिनेत्रा
·शूलधारिणी
advertisement
·पिनाकधारिणी
·चित्रा
·चंद्रघंटा
·महातपा
·मन
·बुद्धि
·अहंकारा
·चित्तरूपा
·चिता
·चिति
·सर्वमंत्रमयी
·सत्ता
·सत्यानंदस्वरुपिणी
·अनंता
·भाविनी
·भव्या
·अभव्या
·सदागति
·शाम्भवी
·देवमाता
·चिंता
·रत्नप्रिया
·सर्वविद्या
·दक्षकन्या
·दक्षयज्ञविनाशिनी
·अपर्णा
·अनेकवर्णा
·पाटला
·पाटलावती
·पट्टाम्बरपरिधाना
·कलमंजरीरंजिनी
·अमेयविक्रमा
·क्रूरा
·सुंदरी
·सुरसुंदरी
·वनदुर्गा
·मातंगी
·मतंगमुनिपूजिता
·ब्राह्मी
·माहेश्वरी
·ऐंद्री
·कौमारी
·वैष्णवी
·चामुंडा
·वाराही
·लक्ष्मी
·पुरुषाकृति
·विमला
·उत्कर्षिनी
·ज्ञाना
advertisement
·क्रिया
·नित्या
·बुद्धिदा
·बहुला
·बहुलप्रिया
·सर्ववाहनवाहना
·निशुंभशुंभहननी
·महिषासुरमर्दिनी
·मधुकैटभहंत्री
·चंडमुंडविनाशिनी
·सर्वसुरविनाशा
·सर्वदानवघातिनी
·सर्वशास्त्रमयी
·सत्या
·सर्वास्त्रधारिणी
·अनेकशस्त्रहस्ता
·अनेकास्त्रधारिणी
·कुमारी
·एककन्या
·कैशोरी
·युवती
·यति
·अप्रौढ़ा
·प्रौढ़ा
·वृद्धमाता
·बलप्रदा
·महोदरी
·मुक्तकेशी
·घोररूपा
·महाबला
·अग्निज्वाला
·रौद्रमुखी
·कालरात्रि
·तपस्विनी
·नारायणी
·भद्रकाली
·विष्णुमाय
·जलोदरी
·शिवदुती
·कराली
·अनंता
·परमेश्वरी
·कात्यायनी
·सावित्री
·प्रत्यक्षा
·ब्रह्मावादिनी।
·अंबे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 5:12 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shardiya Navratri 2025: दुर्गा देवीची 108 नावं माहीत आहेत का? नवरात्रीच्या पूजेवेळी करावा जप