कुंभ - शश राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे. त्यामुळे, यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते.
तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिक यावेळी काही मोठे व्यावसायिक सौदे करू शकतात. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
advertisement
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी शश राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. शनिदेव तुमच्या राशीच्या करिअर आणि व्यवसायाच्या घरात भ्रमण करत आहेत. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे.
बेरोजगारांना त्यांचे करिअर यशस्वी करण्यासाठी चांगली संधी असेल. तुम्ही नवीन योजना बनवू त्यात यश मिळवू शकता. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. रिअल इस्टेटशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता.
जेवायला बसताना या दिशेला तोंड करू नये, विविध मार्गांनी येतात संकटे
मकर - शश राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या घरात भ्रमण करत आहेत. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच तुम्हाला कर्जावर सूट मिळू शकते. आपणास बऱ्याच काळापासून येणाऱ्या समस्यांपासून आराम मिळेल. मनात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असेल. तसेच, या काळात तुमचा संवाद सुधारेल, लोकांना प्रभावित करेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. सुप्त इच्छा पूर्ण होतील.
या जन्मतारखा असलेल्या मुली फार इमोशनल होतात; जोडीदाराशी जुळवून घेण्यात नंबर 1
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)