मौनी अमावस्या 2026 तिथी - अमावस्या तिथीचा प्रारंभ 18 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजून 3 मिनिटांनी होईल आणि सांगता 19 जानेवारीच्या मध्यरात्री 1 वाजून 21 मिनिटांनी होईल. उदयतिथीनुसार मौनी अमावस्या 18 जानेवारी, रविवारी साजरी केली जाईल.
खाण्यापिण्याबाबतचे नियम - या दिवशी मांसाहारी अन्नाचे सेवन पूर्णपणे टाळावे. तुम्ही उपवास करत नसाल तरीही केवळ सात्विक भोजनच करावे. तसेच कोणत्याही प्रकारची नशा किंवा अमली पदार्थांपासून दूर राहावे, अन्यथा पितरांचा कोप होऊ शकतो. घरात खीर बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर करणे हिताचे ठरेल. या दिवशी शिळे अन्न खाणे टाळावे.
advertisement
या गोष्टींचे सेवन करू नये - मौनी अमावस्येच्या दिवशी गाजर आणि बीट खाणे टाळावे. या भाज्या एरवी आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी अमावस्येला त्या वर्ज्य मानल्या जातात. याशिवाय फ्लॉवर (फूलगोभी) आणि पत्ताकोबी यांसारख्या भाज्यांचे सेवन देखील या दिवशी करू नये, असे मानले जाते.
अमावस्येला मौन पाळण्याचे महत्त्व - पौष अमावस्येच्या दिवशी मनुष्याने शक्य तितका वेळ मौन राहावे. मौन राहिल्यामुळे मानसिक शक्ती वाढते आणि आत्मचिंतनास मदत होते. या दिवशी नदीत स्नान करताना आणि दान करताना मौन पाळल्याने हजारो पटीने जास्त पुण्य मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
तुम्हाला दिवसभर मौन राहणे शक्य नसेल, तर किमान पवित्र स्नान आणि पूजा करेपर्यंत तरी मौन पाळावे. काही महत्त्वाचे बोलायचे असेल, तर तोंडाने न बोलता खुणांनी किंवा लिहून संवाद साधावा. मौन राहण्याचा अर्थ केवळ शांत बसणे नाही, तर या काळात मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नयेत किंवा कोणाची निंदा करू नये. स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देताना आणि पितरांचे तर्पण करताना मनातल्या मनात मंत्रांचा उच्चार करावा, मोठ्याने बोलू नये. पूजेनंतर आपल्या क्षमतेनुसार तीळ, गूळ, धान्य किंवा गरम कपड्यांचे दान करावे. दान करतानाही शांत राहणे अधिक फलदायी मानले जाते.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
