TRENDING:

प्रकृतीत सुधारणा पण..., मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल सप्टेंबर?

Last Updated:

मीन राशींच्या मंडळींसाठी सप्टेंबर महिना खास आहे. पण योग्य काळजी घ्यावी लागणार. जाणून घ्या राशिभविष्य

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 30 ऑगस्ट: नवा दिवस, महिना अथवा नवीन वर्ष सुरू होणार म्हटलं की अनेकजण आपलं राशिभविष्य पाहतात. आपल्याला हा महिना कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता असते. आता ऑगस्ट संपून सप्टेंबर महिना सुरू होत आहे. त्यामुळे राशिचक्रात हा महिना कसा असेल? हे अनेकजण पाहत असतात. हेच वर्धा येथील ज्योतिषाचार्य पंडीत सतीश शर्मा यांनी सांगितले आहे.
advertisement

कुणाची रास असते मीन?

मीन राशी ही राशीतील बारावे ज्योतिषचिन्ह आहे. जे मीन नक्षत्रापासून उगम पावते. पूर्वाभद्र नक्षत्र (चौथा टप्पा), उत्तर भद्रा नक्षत्र (4), रेवती नक्षत्र (4) अंतर्गत जन्मलेले लोक मीन राशीच्या अंतर्गत येतात. या राशीचा स्वामी गुरू आहे. मीन राशीवर चंद्र फिरतो तेव्हा जन्मलेल्यांची राशी मीन राशी असते. आता या राशीसाठी सप्टेंबर महिना कसा असेल हे जाणून घेऊया.

advertisement

सणासुदीच्या दिवसात होणार अचानक धनलाभ, मेष राशीसाठी कसा असेल सप्टेंबर?

काय सांगतात जोतिष्याचार्य?

सप्टेंबर महिन्यामध्ये मीन राशींच्या मंडळींना व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांची प्रसन्नता राहील. मित्र आणि आदरणीय व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. तसेच प्रकृतीत सुधारणा देखील होणार आहे. प्रकृतीची साथ असणार आहे. मात्र लहान लहान अपघातांपासून सावध राहावे लागेल, असे शर्मा यांनी सांगितले.

advertisement

शुभ फलप्राप्तीसाठी उपाय

सप्टेंबर महिन्यात मीन राशीच्या मंडळींना शुभ फळप्राप्तीसाठी बजरंग बलीची उपासना करणं गरजेचं आहे. त्यासाठी पाच ओल्या नारळाचे तोरण गावातील मारुतीच्या जुन्या मंदिरात लावायचे आहे. तसेच 5 मंगळवारी उपवास केल्यास शुभ फळ मिळेल. उपवासात खंड पडल्यास त्याचे फळ मिळणार नाही. जर खंड पडला तर पुन्हा सुरुवात करून पाच मंगळवारी उपवास करावे लागणार आहे. त्यामुळे दर मंगळवारी उपवास करावा, असं पंडित सतीश शर्मा यांनी सांगितलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
प्रकृतीत सुधारणा पण..., मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल सप्टेंबर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल