TRENDING:

Navratri 2025 Colours: देवी दुर्गेची 9 रुपं आणि नऊ रंग..! शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ

Last Updated:

Nine Colors of Navratri and their Significance: नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे महत्त्व असते आणि त्या रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. हे नऊ रंग देवीच्या नऊ रूपांशी आणि त्यांच्या विविध गुणांशी संबंधित आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शारदीय नवरात्र उत्सव सोमवार, 22 सप्टेंबर रोजी सुरू होत असून गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्र हा संपूर्ण भारतात साजरा होणारा मोठा सण आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे महत्त्व असते आणि त्या रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. हे नऊ रंग देवीच्या नऊ रूपांशी आणि त्यांच्या विविध गुणांशी संबंधित आहेत. नवरात्र उत्सवात रंगांना विशेष महत्त्व आहे. देवी पुराणात किंवा धार्मिक ग्रंथांमध्ये याचा तसा उल्लेख नसला तरी नऊ दिवस नऊ वेगवेगळे रंग परिधान केले जाते. जाणून घेऊया की कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि प्रत्येक देवीनुसार कोणता रंग योग्य आहे.
News18
News18
advertisement

दुर्गेची 9 रूपे आणि 9 रंग 

शैलपुत्री - नऊ दुर्गांपैकी पहिले रूप असलेली देवी शैलपुत्रीची पूजा प्रतिपदेला केली जाते. देवी ही पर्वतीय राजा हिमालयाची कन्या आहे, जी स्थिरता, शक्ती आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. कदाचित म्हणूनच आपण पिवळ्या रंगापासून सुरुवात करतो, हा रंग सूर्याच्या पहिल्या किरणांप्रमाणेच जीवनात उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मक विचार आणतो, असं मानलं जातं.

advertisement

ब्रह्मचारिणी - द्वितीयेला, देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी ही कठोर तपश्चर्येची देवी आहे. तिचे जीवन संयम, ध्यान आणि अध्यात्माशी जोडलेले आहे, म्हणून हिरवा रंग तिचे वैशिष्ट्य आहे. हा रंग शांती आणि आत्म-नियंत्रणाचे प्रतीक मानला जातो.

चंद्रघंटा - तृतीयेला, देवी चंद्रघंटा यांची पूजा केली जाते. तिच्या कपाळावर घंटा आकाराचा चंद्रकोर आहे, ज्यामुळे तिला असं नाव मिळालं आहे. तिच्याकडे शस्त्रे धरलेले दहा हात आहेत आणि तिचे वाहन सिंह आहे. देवीचा संबंध शांती, स्थिरता आणि भूमीशी आहे, त्यामुळे या दिवशी राखाडी रंग परिधान करतात, तो संतुलनाचा रंग मानला जातो. हा रंग संतुलन तसेच सौम्यता दर्शवितो, जो शक्ती आणि शांती दोन्ही असलेल्या देवी चंद्रघंटा यांच्या गुणांशी जुळतो.

advertisement

कुष्मांडा - चतुर्थीला देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. देवीला विश्वाची आणि आदिशक्तीची निर्माती मानली जाते. तिचे गुण नारंगी रंगाशी जुळतात, हा रंग निर्मिती आणि शक्तीचा रंग आहे. तो आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि उत्साही जीवनाचे प्रतीक मानला जातो.

स्कंदमाता - नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. तिचे मातृप्रेम स्थिर आहे, म्हणून या दिवशी पांढरा रंग पसंत केला जातो. हा रंग प्रेम आणि पवित्रतेचे प्रतिनिधित्व करतो. देवी स्कंदमाता प्रेम आणि करुणेची देवी मानली जाते. पांढरा रंग शांती, साधेपणा आणि शुद्धतेचे प्रतीक आहे.

advertisement

दसऱ्यापासून या 5 राशींचा गोल्डन टाईम येणार; करिअर-व्यवसायात मोठी उसळी, सुख

कात्यायनी - षष्ठी देवी कात्यायनीला समर्पित आहे. देवी धैर्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे. तिने राक्षसांचा वध केला, म्हणून लाल रंग, धैर्य आणि प्रेमाचे प्रतीक असून तिच्या गुणांशी जुळतो. या शक्तिशाली देवीनं राक्षसांचा वध केला. लाल रंग शौर्य, प्रेम आणि शक्ती दर्शवितो.

advertisement

कालरात्री - सप्तमीला कालरात्री मातेचे स्मरण करून तिचे ध्यान केले जाते. ती भय आणि अंधाराचा नाश करणारी देवी आहे, म्हणून हे गुण निळ्या रंगात प्रतिबिंबित होतात, हा रंग गूढता आणि संरक्षणाचा समानार्थी आहे. गडद निळा संरक्षण, दृढता आणि आंतरिक शक्ती दर्शवितो.

महागौरी - ओम महागौरीय नमः! अष्टमीला देवीचे आठवे रूप, महागौरीची पूजा केली जाते. महागौरी ही सौम्यता आणि पवित्रतेची देवी आहे. गुलाबी रंग तिच्या कोमलता आणि कृपेचे प्रतिनिधित्व करतो. हा रंग करुणा, स्नेह आणि स्त्रीत्वाचा रंग आहे.

सिद्धिदात्री - नवमी ही सिद्धीची देणगी देणाऱ्या देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे. नावाप्रमाणेच, देवीचा संबंध सिद्धीशी आहे, तो केवळ ज्ञानानेच मिळवता येतो. देवीचा हा गुण जांभळ्या रंगाशी जुळतो. जांभळा रंग अध्यात्म, वैभव आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.

मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Navratri 2025 Colours: देवी दुर्गेची 9 रुपं आणि नऊ रंग..! शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल