TRENDING:

तब्बल ३० वर्षांनी नवपंचम राजयोग! १७ नोव्हेंबरपासून ३ राशींच्या जीवनात सुखाच्या अतिवृष्टीसह पैशांचा पाऊस पडणार

Last Updated:

Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करतो आणि सुमारे ३० दिवस एका राशीत राहतो. सूर्य हा आत्मा, वडील, सत्ता, नेतृत्व, प्रतिष्ठा आणि सरकारी पदांचा कारक मानला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करतो आणि सुमारे ३० दिवस एका राशीत राहतो. सूर्य हा आत्मा, वडील, सत्ता, नेतृत्व, प्रतिष्ठा आणि सरकारी पदांचा कारक मानला जातो. त्यामुळे सूर्याच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येतो. यावेळी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याच वेळी शुक्र व मंगळाच्या युतीत राहणार आहे. याच काळात, १७ नोव्हेंबर रोजी सूर्य आणि शनीच्या संयोगातून “नवपंचम राजयोग” तयार होणार आहे, जो काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो.
Navpancham Rajyog 2025
Navpancham Rajyog 2025
advertisement

सामान्यतः सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र म्हणून ओळखले जात असले तरी दोघांमध्ये शत्रुत्वाचे नाते असल्याचे ज्योतिषात म्हटले जाते. परंतु या वेळी मीन राशीत शनी वक्री गतीत असल्याने आणि सूर्य वृश्चिकेत प्रवेश करणार असल्याने, कर्क, वृश्चिक आणि मकर राशींवर या संयोगाचा विशेष परिणाम दिसून येईल.

नवपंचम राजयोग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२३ वाजता सूर्य आणि शनी एकमेकांपासून १० अंशांवर असतील. या स्थितीत निर्माण होणारा “नवपंचम राजयोग” अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या योगामुळे काही राशींच्या लोकांना आत्मविश्वास, आर्थिक लाभ, आणि करिअरमध्ये प्रगती मिळू शकते.

advertisement

कर्क राशी

या राशीसाठी नवपंचम राजयोग अतिशय फायदेशीर ठरेल. मीन राशीत वक्री शनी आणि वृश्चिक राशीत सूर्य असल्याने, कर्क राशीच्या लोकांच्या नशिबात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील, वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल, आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा बोनस मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा असेल. आर्थिक स्थैर्य वाढेल आणि बचत करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा वाढेल आणि आरोग्य उत्तम राहील.

advertisement

वृश्चिक राशी

या राशीत सूर्य स्वतः प्रवेश करत असल्यामुळे हा काळ अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी असेल. मेहनतीतून लाभ मिळेल, आणि व्यवसायिकांना मोठा नफा किंवा नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडतील आणि कामाचे कौतुक होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल. वैवाहिक जीवनात समरसता वाढेल, तर आरोग्यही चांगले राहील.

advertisement

मकर राशी

शनी आणि सूर्याचा नवपंचम राजयोग या राशीसाठीही शुभ ठरेल. या काळात सूर्य अकराव्या घरात आणि शनी दुसऱ्या घरात असेल, ज्यामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आणि वातावरण आनंदी बनेल. नोकरीत मेहनतीचं फळ मिळेल, तसेच वडिलोपार्जित व्यवसायातून मोठा नफा होऊ शकतो. काहींना अनपेक्षित यश किंवा मोठा करार मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
BMW पेक्षा महाग रेडा, गजेंद्रची किंमत ऐकून डोकं फिरल, खुराक अन् कमाई तर बघूच नका
सर्व पहा

(सदर बातमी फक्त महितीकरीता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
तब्बल ३० वर्षांनी नवपंचम राजयोग! १७ नोव्हेंबरपासून ३ राशींच्या जीवनात सुखाच्या अतिवृष्टीसह पैशांचा पाऊस पडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल