गोचर म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानुसार,'गोचर' म्हणजे एखाद्या ग्रहाचे एका राशीतून दुसऱ्या राशीत किंवा नक्षत्रात होणारे संक्रमण. प्रत्येक ग्रहाचा राशी आणि नक्षत्रात राहण्याचा विशिष्ट कालावधी असतो. तो कालावधी पूर्ण झाल्यावर ग्रह पुढील राशीत प्रवेश करतो, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील घरे, नशीब, आणि जीवनातील घटनांवर दिसून येतो.
राहूचा शतभिषा नक्षत्रात प्रवास
राहू नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल आणि तो २ ऑगस्ट २०२६ पर्यंत या नक्षत्रात राहील. म्हणजे तब्बल आठ महिने राहू स्वतःच्या अधिपत्यात भ्रमण करेल. या काळात राहूची शक्ती अधिक प्रभावी होईल आणि अनेक राशींवर त्याचा ठळक परिणाम दिसेल. विशेष म्हणजे, हा कालखंड तीन राशींसाठी अत्यंत लाभदायक आणि भाग्यवर्धक ठरण्याची शक्यता आहे.
advertisement
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी राहूचा हा प्रवास करिअर आणि आर्थिक क्षेत्रात शुभ परिणाम देणारा ठरेल. दीर्घकाळाच्या परिश्रमानंतर आता त्यांना यश मिळेल. नोकरीतील पदोन्नती, मोठे व्यावसायिक करार आणि प्रलंबित प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात स्थैर्य येईल आणि मुलांबाबतच्या चिंताही कमी होतील. कामकाजात अचानक संधी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना राहूचा शतभिषा नक्षत्रातील गोचर करिअर आणि आर्थिक वाढीची नवी दिशा देईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि बढतीची संधी मिळू शकते. व्यवसायिकांना नवीन करार किंवा भागीदारीमुळे चांगला नफा होईल. दीर्घकाळ थांबलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि घरातील वातावरणात आनंद निर्माण होईल. हा काळ व्यावसायिक यशाबरोबरच मानसिक शांती आणि आत्मविश्वास देणारा ठरेल.
कुंभ
कुंभ राशीसाठी हा काळ सर्वाधिक शक्तिशाली आणि शुभ ठरेल. राहू स्वतःच्या नक्षत्रात असल्याने त्याचा प्रभाव थेट या राशीवर पडेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. प्रेमसंबंध दृढ होतील आणि प्रेमविवाहाची संधी निर्माण होऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होईल आणि काहींना परदेश प्रवासाची संधीही मिळू शकते. वैयक्तिक जीवनात आनंददायी घटना घडतील आणि अडथळे दूर होतील.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
