TRENDING:

Rama Ekadashi 2025: रमा एकादशी आणि वसूबारस एकत्र; नशिबाची साथ लाभण्यासाठी नक्की करा या गोष्टी

Last Updated:

Rama Ekadashi 2025 Upay: रमा एकादशीचे महत्त्व ब्रह्म-वैवर्त पुराणात भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्या संवादात रमा एकादशीच्या महिमेचा उल्लेख आहे. तसेच, पद्म पुराणात या एकादशीला अत्यंत शक्तिशाली आणि पुण्यदायी एकादशी सांगितले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही रमा एकादशी आहे आणि यावर्षी ही शुभ तिथी १७ ऑक्टोबर, शुक्रवार रोजी आहे. रमा एकादशीचे व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा-अर्चा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगून काही विशेष उपायही सांगितले आहेत. एकादशीच्या दिवशी हा खास उपाय केल्यास धन संबंधित समस्या दूर होतील आणि भगवान विष्णूंचा आशीर्वादही मिळेल. रमा एकादशीचे महत्त्व, शुभ योग आणि पूजा विधी जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

रमा एकादशी २०२५ पंचांग - द्रिक पंचांगनुसार, अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होऊन दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत राहील आणि राहुकाळाची वेळ सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुरू होऊन दुपारी १२ वाजून ६ मिनिटांपर्यंत राहील. या दिवशी सूर्य दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत कन्या राशीत राहील. त्यानंतर तूळ राशीत गोचर करेल आणि चंद्र सिंह राशीत राहील.

advertisement

रमा एकादशी १७ ऑक्टोबर - शुक्रवारची रमा एकादशीची तिथी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुरू होऊन १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर द्वादशी सुरू होईल. अशा प्रकारे उदय तिथी मानून १७ ऑक्टोबर रोजी रमा एकादशीचा सण साजरा केला जाईल.

रमा एकादशी २०२५ शुभ योग - रमा एकादशीच्या दिवशी दोन शुभ योग बनत आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. रमा एकादशीच्या दिवशी शुक्ल योग आणि ब्रह्म योग बनत आहेत. या शुभ योगात भगवान विष्णूची पूजा-अर्चा केल्यास सर्व कार्ये सिद्ध होतात आणि ब्रह्म ज्ञानाची प्राप्तीही होते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा-अर्चा आणि दान केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते आणि व्यक्ती जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.

advertisement

जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अ‌ॅटिट्यूड दाखवतात

रमा एकादशीचे महत्त्व ब्रह्म-वैवर्त पुराणात भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्या संवादात रमा एकादशीच्या महिमेचा उल्लेख आहे. तसेच, पद्म पुराणात या एकादशीला अत्यंत शक्तिशाली आणि पुण्यदायी एकादशी सांगितले आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख-शांती येते व धन-संपदेत वाढ होते. हे व्रत आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी आणि वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी विशेषतः प्रभावी मानले गेले आहे.

advertisement

रमा एकादशी पूजा विधी - रमा एकादशीचे व्रत विधी-विधानाने करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा स्थापित करावी आणि त्यांना फुले, चंदन आणि धूप अर्पण करावे. तुळशीचे पान आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि तुपाचा दिवा लावून श्रद्धा-भावाने देवाची आरती करावी. गरजू लोकांना धान्य, वस्त्र किंवा धन दान केल्यानं पुण्य प्राप्त होते. रमा एकादशीचे व्रत केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर भौतिक सुख देखील देते. या शुभदिनी पूजा आणि उपायांनी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा मिळेल.

advertisement

यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एकाच ठिकाणी दिवाळीचं सर्व सामान, 2 रुपयांपासून करा खरेदी, हे आहे लोकेशन
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Rama Ekadashi 2025: रमा एकादशी आणि वसूबारस एकत्र; नशिबाची साथ लाभण्यासाठी नक्की करा या गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल