ऑगस्टमध्ये शनी अमावस्या - सध्या मराठी श्रावण महिना सुरू आहे असून श्रावणाची अमावस्या 23 ऑगस्ट 2025, रोजी शनिवारी येत आहे. त्यामुळे ती शनी अमावस्या म्हटली जाते. शनि अमावस्या ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी शनि ग्रहाशी संबंधित उपाय केल्यानं खूप फायदे होतात.
शनी अमावस्येसाठी उपाय - ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनिच्या साडेसाती आणि अडीचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत आहे, त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही उपाय करावेत. यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामांपासून दिलासा मिळेल, त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता राहील. दुर्दैव दूर होईल आणि सौभाग्य वाढेल.
advertisement
शनी अमावस्येच्या दिवशी शनी देवाला मोहरीचे तेल अर्पण करा. शनी देवाच्या मूर्तीवर तेल अर्पण करत असाल तर फक्त त्याच्या पायाच्या अंगठ्यावर तेल अर्पण करा. वरून तेल अर्पण करून संपूर्ण मूर्तीवर तेल अर्पण करू नका. शनिदेव बसलेल्या स्थितीत असतील तर संपूर्ण मूर्तीवर तेल अर्पण करता येते.
टेन्शन-धाकधूक, पण अखेर प्रयत्न फळास! शनी उघडणार या 4 राशींच्या नशिबाचे दरवाजे
- शनि अमावस्येच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
- शनि अमावस्येच्या दिवशी, मोहरीचे तेल, काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडी वस्तू यासारख्या शनिच्या वस्तूंचे दान करा.
- शनि अमावस्येच्या दिवशी पूजा करताना 'ओम शनिश्चराय नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करा.
- शनि देवाच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करणे. शनी देव बजरंगबलीच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत, असे मानले जाते.
- शनि अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावा. तुमच्या क्षमतेनुसार कपडे, बूट, अन्न, पैसे दान करा, याचा चांगला परिणाम दिसून येतो.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
