या राशींना राहावं लागणार सावध
मेष: शनी तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या साडेसातीचा दुसरा आणि सर्वात कठीण टप्पा सुरू होईल. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. विनाकारण खर्च वाढतील आणि कामात अडथळे येतील.
मीन: मीन राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल. आर्थिक नुकसानाची शक्यता असल्याने गुंतवणुकीत सावध राहावे लागेल.
advertisement
धनु: शनीच्या या बदलामुळे धनु राशीवर शनीची अडीचकी सुरू होईल, ज्यामुळे कौटुंबिक कलह वाढू शकतात.
सिंह: सिंह राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ संघर्षाचा असेल. नोकरीत बदलाचे योग आहेत, परंतु तो बदल आव्हानात्मक ठरू शकतो.
शनी कोणाला देतो साथ आणि कोणाला देतो संघर्ष?
शनी हा क्रूर ग्रह नसून तो एक शिस्तप्रिय शिक्षक आहे. शनीचे फळ हे पूर्णपणे व्यक्तीच्या 'कर्मावर' अवलंबून असते.
शनी कोणाची साथ देतो? जे लोक प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत आणि गरिबांना मदत करतात, त्यांना शनी कधीच त्रास देत नाही. जे लोक शिस्त पाळतात, खोटे बोलत नाहीत आणि निसर्गाचा आदर करतात, त्यांना शनीच्या साडेसातीतही मोठी पदे आणि संपत्ती मिळते. शनी अशा लोकांचे रक्षण करतो ज्यांचे आचरण शुद्ध असते.
शनी कोणाला संघर्ष करायला लावतो? जे लोक इतरांना फसवतात, आळशी आहेत, आपल्या सत्तेचा गैरवापर करतात किंवा स्त्री आणि वृद्धांचा अपमान करतात, त्यांना शनी कठोर दंड देतो. शनीच्या काळात अशा लोकांचे अहंकार गळून पडतात आणि त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागते. शनीचा संघर्ष हा व्यक्तीला शुद्ध करण्यासाठी आणि जीवनाचे खरे मूल्य शिकवण्यासाठी असतो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
