शनी वक्री अवस्थेत असताना कामांमध्ये विलंब, अडचणी आणि ताणतणाव वाढतात. पण जेव्हा शनी मार्गी होतो, तेव्हा नवीन संधी, स्थिरता आणि प्रगतीचा काळ सुरू होतो. या वेळी काही राशींना विशेष लाभ मिळणार असला, तरी काहींनी मात्र काळजी घ्यायला हवी.
advertisement
मेष - राशीच्या जातकांवर सध्या शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी मार्गी झाल्यानंतर तुमच्या कामांमध्ये काही प्रमाणात गती येईल, पण ताण आणि जबाबदाऱ्या देखील वाढतील. नोकरीत अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि वरिष्ठांचा दबाव वाढू शकतो. घरगुती पातळीवर किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शांतता आणि संयम राखा. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीचे निर्णय घाईघाईत घेऊ नका.
कुंभ - राशीच्या लोकांवर साडेसातीचा अंतिम टप्पा आहे. या काळात आरोग्य आणि आर्थिक व्यवहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. शनी मार्गी होत असताना काही जुन्या जबाबदाऱ्या पुन्हा समोर येऊ शकतात. नोकरदारांना अतिरिक्त काम करावे लागू शकते, तर व्यावसायिकांनी मोठ्या व्यवहारांपासून दूर राहावे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. शनी मार्गी झाल्यावर अडचणींचा थोडा भार कमी होईल आणि आर्थिक स्थैर्याची चिन्हे दिसतील.
मीन - राशीतील लोकांवर सध्या शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. शनी मार्गी झाल्याने काही वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये बदल जाणवतील. मानसिक तणाव वाढू शकतो, तसेच आर्थिक दबावही राहील. मोठे निर्णय घेण्याआधी विचारपूर्वक पाऊल टाका. कुटुंबात गैरसमज होऊ शकतात. म्हणून संवाद साधताना संयम बाळगा. आरोग्याबाबत सतर्कता ठेवा, विशेषतः झोप आणि आहार याकडे लक्ष द्या.
