शनिदेव 'वक्री' होणे म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषानुसार, जेव्हा एखादा ग्रह पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा तो मागे जात असल्याचा भास होतो, यालाच 'वक्री' होणे म्हणतात. वक्री अवस्थेत शनी अधिक शक्तिशाली होतो. शनीचा हा वक्री काळ व्यक्तीला आत्मपरीक्षण करायला लावतो. जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात, त्यांना वक्री शनी अनपेक्षित यश आणि रखडलेले पैसे मिळवून देतो.
advertisement
'या' 3 राशींचे नशीब सोन्यासारखे उजळणार
मेष
मेष राशीच्या जातकांसाठी शनी 12 व्या भावात वक्री होणार आहे. सध्या तुमची साडेसाती सुरू असली तरी, शनीची वक्री चाल तुम्हाला दिलासा देणारी ठरेल.
जुन्या कर्जातून तुमची मुक्तता होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक नफा मिळेल. जे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते, ते आता वेगाने पूर्ण होईल. आध्यात्मिक कामात तुमची प्रगती होईल.
कर्क
कर्क राशीच्या कुंडलीत शनी 9 व्या भावात म्हणजेच भाग्य स्थानी वक्री होणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील, ज्यामुळे पदोन्नतीचे योग येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभाची शक्यता आहे.
मकर
मकर राशीचा स्वामी स्वतः शनी आहे. शनी तुमच्या तिसऱ्या भावात वक्री होत आहे, जे पराक्रम आणि धैर्याचे स्थान आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. लहान भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. सामाजिक कार्यात तुमची प्रसिद्धी वाढेल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
