शनिवारी कोणत्या गोष्टींचे दान करू नये -
पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान टाळा - शनिवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करण्यास मनाई आहे, कारण शनिदेवाला पांढरा रंग आवडत नाही. पांढऱ्या रंगाचा संबंध चंद्राशी मानला जातो आणि शनिदेव व चंद्र यांच्यात शत्रुत्व आहे. जर तुम्ही पांढरे कपडे, तांदूळ किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू दान केल्या तर पुण्य मिळण्याऐवजी तुमच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. या गोष्टींच्या दानामुळे शनिदेव क्रोधित होण्याची शक्यता असते.
advertisement
लाल रंगाच्या वस्तूंनी पुण्य मिळणार नाही - शनिवारी लाल रंगाच्या वस्तू जसे की लाल कपडा, सिंदूर इत्यादी दान करणे अशुभ मानले जाते. नवग्रहांमध्ये लाल रंगाचा संबंध सूर्याशी आहे, तर शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. लाल रंगाचे दान केल्याने ग्रहांचे संतुलन बिघडू शकते. सूर्य आणि शनि हे पिता-पुत्र असले तरी त्यांच्यात पटत नाही आणि ते एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात.
शनी अस्ताला गेला की या राशींचे हाल! 13 मार्चपासून पुढे 35 दिवस अलर्ट मोडवर राहा, अन्यथा..
पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान नको - ज्योतिषशास्त्रात पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा संबंध देवगुरु बृहस्पतीशी मानला जातो. शनिदेव आणि बृहस्पती यांच्यात शत्रुत्वाचा भाव सांगितला आहे. शनिवारी केलेले दान हे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी असते, त्यामुळे या दिवशी सोने, पितळ, गहू, बेसन, हळद, पिवळी डाळ किंवा पिवळे कपडे यांसारख्या वस्तूंचे दान चुकूनही करू नये.
शनिवारी मीठ दान करू नका - शनिवारी मीठ दान केल्याने घराची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते, असे मानले जाते. पैशाचे नुकसान आणि कर्ज वाढू शकते. त्यामुळे या दिवशी मिठाचे दान न करण्याचा सल्ला दिला जातो.
मोहरीचे तेल - मोहरीचे तेल शनिदेवाला अर्पण करणे शुभ असते, पण काही परंपरांनुसार ते थेट एखाद्या व्यक्तीला दान करणे टाळावे. त्याऐवजी शनि मंदिरात जाऊन तेल अर्पण करणे किंवा तिथे दिवा लावणे जास्त चांगले मानले जाते.
अशुभ दिशा शुभ परिणाम देऊ लागते; वास्तुनुसार घरात नेहमी दक्षिण बाजूलाच ठेवायच्या या 5 गोष्टी
प्लास्टिक आणि काचेच्या वस्तू - ज्योतिषशास्त्रात प्लास्टिक आणि काचेचा संबंध शनिदेवाशी मानला जातो. त्यामुळे शनिवारी या गोष्टींचे दान करू नये. असे केल्याने तुमचे नशीब तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि तुम्हाला वाईट काळाचा सामना करावा लागू शकतो.
