नवरात्रीचा अर्थ 'नऊ रात्री' असा आहे. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करून जगाला त्याच्या अत्याचारांपासून मुक्त करते, अशी धार्मिक कथा आहे. त्यामुळे नवरात्री हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या काळात देवीची पूजा केल्याने भक्तांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि शक्ती मिळते, असे मानले जाते.
advertisement
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते -
1. शैलपुत्री
2. ब्रह्मचारिणी
3. चंद्रघंटा
4. कूष्मांडा
5. स्कंदमाता
6. कात्यायनी
7. कालरात्री
8. महागौरी
9. सिद्धीदात्री
शारदीय नवरात्री : घटस्थापना मुहूर्त
नवरात्रीच्या 9 दिवसांत, देवी दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. या वर्षी शारदीय नवरात्रीला कलशस्थापनेसाठी 2 शुभ मुहूर्त आहेत. प्रतिपदा तिथीला घटस्थापनेचा पहिला मुहूर्त 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:09 ते 8:06 पर्यंत असेल. अभिजीत मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 पर्यंत असेल.
घटस्थापना विधी आणि पूजा -
घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य:
मातीचा कलश (घट)
माती
जवस (बार्ली) किंवा गहू
नारळ
लाल कापड
अक्षता
पाणी
सुपारी
नाणे
पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर)
फुलं, हार, हळद-कुंकू, अगरबत्ती, दिवा
चित्रा नक्षत्रात बुध गोचर! आशा-अपेक्षा सोडलेली असताना या 3 राशींचे भाग्य उजळणार
घटस्थापना करण्याची पद्धत:
सर्वप्रथम, ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे, ती जागा स्वच्छ करावी. नंतर, एका लाकडी पाटावर लाल कापड अंथरून ठेवावे.
मातीचे भांडे (घट) घेऊन त्यात थोडी माती आणि जवस/गहू घालून थोडे पाणी शिंपडावे. हे भांडे पाटावर ठेवावे. आता मातीचा कलश घ्या. त्यात गंगाजल किंवा शुद्ध पाणी भरा. त्यात सुपारी, अक्षता, हळद, कुंकू आणि नाणे टाका. कलशाच्या तोंडावर आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. नारळावर लाल कापड गुंडाळलेले असावे. हा कलश मातीच्या घटावर ठेवा. त्यानंतर 'ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते' हा मंत्र जपून घटस्थापना करावी. घटाजवळ अखंड ज्योत (नऊ दिवस तेवणारा दिवा) प्रज्वलित करावा. देवीच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करावी आणि तिची पूजा करावी. रोज देवीला फुलं, नैवेद्य आणि आरती करावी.
घटस्थापनेचे महत्त्व: घटस्थापना ही नवरात्रीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा विधी आहे. घट हे विश्वाचे आणि देवीच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. घटातील माती आणि त्यात उगवणारे जवस हे सृष्टीच्या निर्मितीचे आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. हा विधी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.
माहेर असो की सासर! नाकाजवळ इथं तीळ असलेल्या महिला पूर्ण कुटुंबाला श्रीमंत बनवतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)