मुंबई : हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण असते, महादेवाच्या मंदिरांमध्ये शिव भक्त गर्दी करतात. पौराणिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात दररोज महादेवाच्या पिंढीवर पाणी अर्पण करून शिव पूजा केल्यानं सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्ती जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते, असे मानले जाते. शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याचे एक अतिशय रहस्यमय आणि पवित्र महत्त्व आहे. विविध प्रकारे याचा श्रद्धावानांना फायदा होतो.
advertisement
शिवलिंगाचा जलाभिषेक - श्रावण महिन्यात अनेक भक्त महादेवाच्या पिंढीवर अर्पण केलेले पाणी चरणामृत समजून डोक्यावर लावून पितात, परंतु बरेच लोक तसं करणं चुकीचं मानतात. विशेष गोष्ट म्हणजे श्रीहरी विष्णू पाण्यात राहतात परंतु जलाभिषेक शिवलिंगाचा असतो. शंकराची अनेक मंदिरे आहेत, तिथं शिवलिंग पाण्यात बुडलेले राहते किंवा धबधब्याचे पाणी थेट शिवलिंगावर पडत राहते. आज आपण शिवलिंगाला अर्पण केलेल्या पाण्याचे उपयोग समजून घेऊ.
शिवलिंग निराकार - शिवपुराणानुसार, शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी पिऊ नये कारण ते अपवित्र मानले जाते. शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी तुमच्या डोळ्यांवर लावू शकता किंवा स्वतःवर शिंपडू शकता परंतु ते पिऊ शकत नाही. ज्योतिषी राकेश चतुर्वेदी यांच्या मते, शिवलिंग हे भगवान शिवाचे निराकार रूप आहे आणि या स्वरूपात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा मिसळल्या जातात, शिवलिंगाला स्पर्श करणारी कोणतीही वस्तू, शिवलिंगावर अर्पण केलेली कोणतीही वस्तू सेवन करू नये.
दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार
ज्योतिषी राकेश चतुर्वेदी यांच्या मते, आपण शिव कुटुंबाची पूजा करत असाल तर तुम्ही पाणी किंवा नैवेद्य खाऊ-पिऊ शकता कारण त्या वेळी महादेव भौतिक स्वरूपात असतात. शंकराच्या भौतिक रूपाला अर्पण केलेले काहीही पिण्यास कोणतीही अडचण नाही. परंतु, शंकराला निराकार रूपाला म्हणजेच शिवलिंगाला अर्पण केलेले काहीही पिऊ नये कारण ते अशुद्ध आणि अपवित्र मानले जाते.
घरी शुद्धीकरणासाठी - शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी अरण्य आहे, म्हणजेच ते प्रथम परमेश्वराला समर्पित केले जाते. हे पाणी नैवेद्य किंवा प्रसादाच्या श्रेणीत येत नाही. ते शुद्ध भावनेने अभिषेक करण्यासाठी मानले जाते. अनेक शैव पंथीय लोक अभिषेक केलेले पाणी जमिनीवर अर्पण करतात किंवा बेलाच्या वृक्षाच्या मुळाशी ओततात. काही भक्त ते पाणी त्यांच्या डोक्यावर शिंपडतात किंवा घरी शुद्धीकरणासाठी वापरतात, परंतु ते पिण्यास सहसा परवानगी नाही.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)